Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७३१ यथा राजन्हस्तिपदे पदानि
___ संलीयन्ते सर्वसत्त्वोद्भवानि । एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान्
सर्वावस्थं संप्रलीनान्निबोध ॥ १२॥६३।२५ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो हे तूं पक्के समज.. ७३२ यथाऽवध्ये वध्यमाने भवेदोषो जनार्दन ।
स वध्यस्यावधे दृष्ट इति धर्मविदो विदुः॥ ५।८२।१८ ( द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते ) वधास पात्र नसलेल्याचा वध होऊ लागला असतां जो दोष लागतो, तोच वधास पात्र असलेल्याचा वध होत नसल्यास दोष लागतो, असे धर्मवेत्त्यांचे मत आहे. ७३३ यथा वायुस्तणाग्राणि संवर्तयति सर्वशः।
तथा कालवशं यान्ति भूतानि भरतर्षभ ॥ १।२।९ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) जसा वारा गवताचे सर्व शेंडे हलवून सोडतो त्याप्रमाणे सर्व प्राणी काळाच्या तडाक्यांत सांपडतात. ७३४ यथाशक्ति मनुष्याणां शममालक्षयामहे ।
। अन्येषामपि सत्त्वानामपि कीटपिपीलिकैः ॥४५०।१४ ( अश्वत्थामा कर्णाला म्हणतो ) आम्हांला वाटते की, मनुष्यांच्या सहनशीलतेला झाली तरी काही मर्यादा असतेच. फार काय पण किडामुंगी वगैरे इतर प्राणीहि काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच दुःखें सहन करितात. ७३५ यथा शरीरं न ग्लायेन्नेयान्मृत्युवशं यथा ।
तथा कर्मसु वर्तेत समर्थो धर्ममाचरेत् ॥ १२॥२६५।१४ ज्याप्रकारे शरीराला थकवा येणार नाही आणि तें मृत्युवश होणार नाही, अशा प्रकारचे कर्माचे आचरण करावे. समर्थ राहून धर्माचरण करावे.
For Private And Personal Use Only