Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७१८ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।
समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥ १२।२८।३६ ज्याप्रमाणे महासागरांत लाकडाचे दोन ओंडके वहात वहात एका ठिकाणी येतात, व [ थोड्या वेळानें ] फिरून एकमेकांपासून दूर जातात, त्यासारखा सर्व प्राण्यांचा एकमेकांशी असणारा सहवास आहे. | ७१९ यथा छायातपौ नित्यं सुसंबद्धौ निरन्तरम् ।
तथा कर्म च कर्ता च संबद्धावात्मकर्मभिः ॥ १३३१७५ प्रकाश व छाया यांचा जसा निरंतर नित्यसंबंध असतो, तसाच कर्म व कर्ता यांचा त्या त्या स्थितीत नित्य संबंध असतो. ७२० यथा जीर्णमजीर्ण वा वस्त्रं त्यक्त्वा तु पूरुषः ।
अन्यद्रोचयते वस्त्रमेवं देहाः शरीरिणाम् ॥ ११॥३९ 'जुने झालेले किंवा कधीकधी नवेंही एक वस्त्र टाकून मनुष्य दुसरे घेतो, त्याप्रमाणेच प्राण्यांच्या देहांचीही गोष्ट आहे. ७२१ यथा दानं तथा भोग इति धर्मेषु निश्चयः ॥ १३॥६२।८
जसे दिले असेल तसेंच भोगावयास मिळते, असा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. ७२२ यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।
तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥ १२॥३२२।१६ हजारों गाईतून वासरूं जसे नेमके आपल्या आईला हुडकून काढते, तसे पूर्वजन्मीं केलेले कर्म कर्त्याच्या पाठोपाठ येते. ७२३ यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।
. एवमाश्रमिणःसर्वे गृहस्थेयान्ति संस्थितिम् ॥१२।२९५।३९ ज्याप्रमाणे सर्व नद्या आणि नद अखेर समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे इतर सर्व आश्रमांतील लोकांना गृहस्थाश्रमी पुरुषाचा आधार आहे.
For Private And Personal Use Only