Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७१२ यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।
। हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः॥ ५।९५।४९ ज्या सभेत सभासदांच्या डोळ्यांदेखत धर्माचा अधर्माने व सत्याचा असत्याने खून केला जातो, त्या सभेतील सभासदांना धिक्कार असो ! ७१३ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीविजयो भूतिध्रुवा नीतिमतिर्मम ॥६।४२।७८ [ संजय धृतराष्ट्राला म्हणतो ] जिकडे योगेश्वर कृष्ण, जिकडे धनुर्धारी अर्जुन, तिकडेच लक्ष्मी, विजय, अखंड वैभव आणि नीति ही राहणार असे माझे मत आहे. ७१४ यत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन ।
न तत्र प्रलपेत्प्राज्ञो बधिरेष्विव गायनः॥५।९२।१३ (विदुर श्रीकृष्णांना म्हणतो ) ज्याप्रमाणे जेथे चांगले बोलण्याचा किंवा वाईट बोलण्याचा उपयोग सारखाच होतो तेथें, बहिऱ्या लोकांमध्ये बसून गायन करणे गवयास योग्य नाही त्याप्रमाणे, शहाण्या पुरुषाने काहीएक न बोलणे चांगले. ७१५ यत्र स्त्री यत्र कितवो बालो यत्रानुशासिता।'
मज्जन्ति तेऽवशा राजन्नद्यामश्मप्लवा इव ॥ ५॥३८॥४३ (विदुर धृतराष्ट्र राजाला म्हणतो ) ज्यांच्यावर स्त्री किंवा लुच्चा मनुष्य किंवा अल्पवयी मुलगा अधिकार चालवीत असेल, ते लोक पराधीन होत्साते, नदीत वुडणाऱ्या पाषाणमय होड्यांप्रमाणे नाश पावतात. ७१६ यत्सुखं सेवमानोऽपि धर्मार्थाभ्यां न हीयते ।।
कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत् ।। ५।३९।६१ ज्या सुखाचे सेवन केले तरी धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाना कांहीं बाध येत नाही, तेंच यथेष्ट सेवन करावे. मूर्खासारखें [ अविचाराचें ] वर्तन करूं नये. ७१७ यथा कर्म तथा लाभ इति शास्त्रनिदर्शनम् ॥१२॥२७९।२० जसे कर्म तसें फळ असा शास्त्राचा सिद्धांत आहे.
For Private And Personal Use Only