Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७०५ यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् ।
तृष्णाक्षयसुखस्यैते नाईतः षोडशी कलाम् ॥१२।१७४१४६ इहलोकों विषयोपभोगापासून प्राप्त होणारे सुख आणि स्वर्गातील उच्च सुख ही दोनहि सुखें वासनाक्षयामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाच्या पासंगास देखील लागणार नाहीत. ७०६ यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् ।
हितं च परिणामे यत्तदाचं भूतिमिच्छता ॥५॥३४।१४ जें खातां येण्यासारखे असेल, खाल्ल्यावर जें पचेल, व परिणामी में हितकर होईल तेंच अन्न कल्याणेच्छु पुरुषाने खाल्ले पाहिजे. ७०७ यतो धर्मस्ततो जयः ॥१३॥१६७४१
जिकडे धर्म तिकडे जय. ७०८ यत्करोति शुभं कर्म तथा कर्म सुदारुणम् ।
तत्कतेंव समश्नाति बान्धवानां किमत्र ह॥१२।१५३१४१ कोणीहि जे चांगले कर्म करतो अथवा वाईट कर्म करतो, त्याचे फळ त्याचे त्यालाच भोगावे लागते. यांत त्याच्या नातलगांचा काय संबंध ? ७०९ यत्तु कार्यं भवेत्कार्यं कर्मणा तत्समाचर ।
हीनचेष्टस्य यः शोकः स हि शत्रुधनंजय ॥७८०८ ( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ) उद्दिष्ट साधण्यासाठी जे करावयाचें तें करण्याच्या उद्योगाला लाग. अर्जुना, जो प्रतिकाराचा काही उद्योग करीत नाही, त्याचा शोक हा शत्रुच होय. ७१० यत्नो हि सततं कार्यस्ततो दैवेन सिध्यति ॥१२॥१५३१५०
सतत प्रयत्न करीत असावे; म्हणजे दैववशात् यश मिळेल. ७११ यत्र दानपति शूरं क्षुधिताः पृथिवीचराः ।
प्राप्य तुष्टाः प्रतिष्ठन्ते धर्म कोऽभ्यधिकस्ततः।।५।१३२।२८ पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशी आले असतां संतुष्ट होऊन पुढे जातात, त्याच्या धर्मापेक्षा कोणता धर्म अधिक आहे ?
म. भा. ८
For Private And Personal Use Only