Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
rrrrrrrrrrrrrrrr६८० महानप्येकजो वृक्षो बलवान्सुप्रतिष्ठितः।
प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात् ॥ ५॥३६॥६२ अथ ये सहिता वृक्षाः सङ्घशः सुप्रतिष्ठिताः ।
ते हि शीघ्रतमान्यातान्सहन्तेऽन्योन्यसंश्रयात् । ५।३६।६३ एकटा एक वृक्ष मोठा, बळकट असला, व भुईत खोल गेलेला असला तरी ( सोसाट्याच्या ) वाऱ्याने एका क्षणांत खोडासहवर्तमान त्याचा चुराडा होणे शक्य आहे. परंतु, जे एकत्र वाढलेले वृक्ष एका जमावाने बळकट पायावर उभे असतात, ते एकमेकांच्या आधारामुळे अति प्रचंड वायूंनाहि दाद देत नाहीत. ६८१ महान्भवत्यनिर्विण्णः सुखं चानन्त्यमश्नुते ॥ ५॥३९॥५९
सतत उद्योग करणाराच पुरुष योग्यतेला चढत असून अक्षय्य सुखहि त्यालाच प्राप्त होते. ६८२ माता पिता बान्धवानां वरिष्ठौ
___ भार्या जरा वीजमानं तु पुत्रः । भ्राता शत्रुः क्लिन्नपाणिर्वयस्य
आत्मा ह्येकः सुखदुःश्वस्य भोक्ता ॥ १२॥१३९।३० आईबाप हे सर्व आप्तवर्गात वरिष्ठ होत. भार्या ही पुरुषाला वार्धक्य आणण्यास कारणीभूत होत असते. पुत्र हा केवळ आपले बीज होय. भाऊ हा ( वाटणी घेत असल्यामुळे ) शत्रुच होय. जोवर हात भिजत आहे तोवरच मित्र. सारांश, सुख किंवा दुःख भोगणारा आत्मा हा आपला एकटा एक आहे. ६८३ मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च ।
संसारेप्नुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे ।। १८।५।६० निरनिराळ्या हजारों जन्मांत अनुभवलेली हजारों आईवा व शेंकडों स्त्रिया आणि पुत्र ही सर्व मरून जातात व यापुढे होणारी इतरहि मरणारच. ६८४ मातृलाभे सनाथत्वमनाथत्वं विपर्यये ।। १२।२६६।२६
आई असली तरच मनुष्य सनाथ असतो, ती नसली की अनाथ होतो.
For Private And Personal Use Only