Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६६२ भीमसेनस्तु धर्मेण युध्यमानो न जेष्यति । - अन्यायेन तु युध्यन्वै हन्यादेव सुयोधनम् ॥ ९।५८।४.
[ श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ] भीमसेन जर धर्माने लढेल तर त्यास जय मिळणार नाही; परंतु जर अन्यायाने युद्ध करील तर खात्रीने सुयोधनास ठार करील. ६६३ भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥६।२७१३
जे केवळ आपल्यासाठी अन्न शिजवितात, ते पातकी लोक [ त्या अन्नाच्या रूपानें ] पापच भक्षण करितात. ६६४ भूतं हित्वा च भाव्यर्थे योऽवलम्बेत्स मन्दधीः॥११२३३११५
प्राप्त झालेल्या फळाचा त्याग करून पुढे मिळणाऱ्या फळाची जो आशा करीत बसतो तो मूर्ख होय. ६६५ भूतिः श्रीींधृतिः कीर्तिर्दक्षे वसति नालसे॥१२।२७।३२
वैभव, संपत्ति, विनयशीलपणा, धैर्य व कीर्ति ही सर्व तत्परतेने उद्योग करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी वास करितात; आळशाच्या ठिकाणी रहात नाहीत. ६६६ भूमिरेतौ निगिरति सर्पो बिलशयानिव ।
राजानं चाप्ययोद्धारंब्राह्मणं चाप्रवासिनम॥१२।२३।१५ युद्ध न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या दोघांना, बिळांत राहणाऱ्या प्राण्यांना सर्प खाऊन टाकतो त्याप्रमाणे, भूमि गिळून टाकते. ६६७ भूयांसं लभते क्लेशं या गौर्भवति दुर्दुहा । .....अथ या सुदुहा राजन्नैव तां वितुदन्त्यपि ॥ १२॥६७९
जी गाय धार काढू देण्यास फार त्रास देते, तिला अतिशय क्लेश भोगावे लागतात; पण जी मुखानें दूध देते तिला मुळीच कोणी त्रास देत नाही. ६६८ भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजयाः परैः।
तस्मात्सङ्घातयोगेन प्रयतेरन्गणाः सदा ॥ १२॥१०७।१४ समुदायांत भेद उत्पन्न झाला की त्यांचा सर्वथा नाश ठरलेलाच. कारण त्यांच्यांत फूट पडली म्हणजे शत्रु त्यांचा सहज पराभव करूं शकतात. यास्तव, समुदायांनी नेहमीं संघशक्तीने कार्य करावें.
For Private And Personal Use Only