Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६५५ भारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति यः।
यस्तु ग्रन्थार्थतत्त्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा।।१२।३०५।१४ ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाहीं [ पण जो नुसती घोकंपट्टी करतो ] तो त्या ग्रंथाचा केवळ भार वाहतो. परंतु ज्याने ग्रंथाच्या अर्थाचे रहस्य जाणले त्याचाच अभ्यास सार्थकी लागला. ६५६ भार्यायां रक्ष्यमाणायां प्रजा भवति रक्षिता ।
प्रजायां रक्ष्यमाणायामात्मा भवति रक्षितः ॥ ३।१२।६९ भार्थेचे संरक्षण होऊ लागले असतां संततीचे संरक्षण होते, आणि संततीचे संरक्षण होऊ लागले असतां आपले संरक्षण होतें. ६५७ भार्या हि परमो ह्यर्थः पुरुषस्येह पठ्यते ।
असहायस्य लोकेऽस्मिल्लोकयात्रासहायिनी।।१२।१४४।१४ भार्या ही पुरुषाची इहलोकांतील परमश्रेष्ठ संपत्ति होय असे म्हटलेले आहे. या जगांत असहाय असलेल्या पुरुषाला संसाराच्या कामी साहाय्य करणारी तीच आहे. ६५८. भार्याहीनं गृहस्थस्य शून्यमेव गृहं भवेत् ॥१२॥१४४५ ___ भार्येवांचून गृहस्थाचे घर रिकामेच वाटते. ६५९ भिन्नानामतुलो नाशः क्षिप्रमेव प्रवर्तते ॥ १।२९।२०
ज्यांच्यांत भिन्नभाव उत्पन्न झाला त्यांचा तत्काळ सर्वथा नाश होतो. ६६० भिन्नाश्लिष्टा तु या प्रीतिने सा स्नेहेन वतेते॥१२॥११११८५
एकदा मोडून पुनः जोडलेला स्नेह स्नेहाच्या रूपाने टिकत नाही. ६६१ भीतवत्संविधातव्यं यावद्भयमनागतम् ।
आगतं तु भयं दृष्ट्वा प्रहतव्यमभीतवत् ॥ १।१४०।८२ संकट जोवर प्राप्त झालेले नाही, तोवर भित्र्या माणसाप्रमाणे त्याच्या निवारण्याच्या तजविजीत असावे. परंतु संकट येऊन ठेपलें असें दिसतांच, शूराप्रमाणे त्यास तोंड द्यावें.
For Private And Personal Use Only