Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६४९ ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभि
स्तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम् । स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः
क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ॥१२॥३२१।२४ ( व्यासमुनि शुकाला सांगतात.) पुष्कळ प्रकारे तप करावें तेव्हांच ब्राह्मणत्व प्राप्त होत असते. ते लाभल्यावर विषयांच्या नादी लागून व्यर्थ दवडू नये. आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा असेल तर वेदाभ्यास, तप व इंद्रियदमन यांमध्ये नेहमी दक्ष राहून सत्कर्म करून झटून प्रयत्न कर. ६५० भक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम् ।
___ लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते ।। ५/३४१३ ___ उत्तम प्रकारच्या खाद्य पदार्थाने आच्छादलेला लोखंडाचा गळ मासा लोभाने झडप घालून गिळून टाकतो, [ असें करितांना ] पाठीमागून परिणाम काय होईल इकडे त्याचे लक्ष्य नसते. ६५१ भज्येतापि न संनमेत् ॥ ९।५।१४
तुटून जावे पण वाकू नये. ६५२ भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा ।
लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ॥१।१४०५० भित्रा असेल त्याला भीति दाखवून फितूर करावा; शूराला हात जोडून, लोभी असेल त्याला द्रव्य देऊन, आणि बरोबरीचा किंवा दुर्बळ असेल त्याला जबरदस्तीने वश करावा. ६५३ भर्तव्या रक्षणीया च पत्नी हि पतिना सदा ॥३॥६९।४१
पतीनें निरंतर पत्नीचे पोषण व रक्षण केले पाहिजे. ६५४ भवितव्यं सदा राज्ञा गर्भिणीसहधर्मिणा ॥१२॥५६१४४
ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्री गर्भाचे संगोपन करते, त्याप्रमाणे राजानें निरंतर प्रजाजनांचे रक्षण करावें.
For Private And Personal Use Only