Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६३५ बलवान्वा कृती वेति कृती राजन्विशिष्यते ॥ ९॥३३९
(श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, बलवान् आणि कृती यांच्यांता श्रेष्ठ कोण असा विचार करतां, कृती (म्हणजे डावपेंच जाणणारा, युक्तिमान् ), हाच श्रेष्ठ ठरतो. ६३६ बलिना संनिकृष्टस्य शत्रोरपि परिग्रहः।
कार्य इत्याहुराचार्या विषमे जीवितार्थिना ॥१२॥१३८।४५ संकटांत सांपडल्यास जीविताची इच्छा करणाऱ्या वलाढ्यहि प्राण्याने आपल्या समीप असणाऱ्या शत्रूचाहि आश्रय करावा, असें नीतिशास्त्राच्या आचार्योनों सांगितलेलें आहे. ६३७ बहवः पण्डिता मूर्खा लुब्धा मायोपजीविनः ।
कुयुर्दोषमदोषस्य बृहस्पतिमतेरपि ॥ १२॥१११।६३ अनेक पंडित आणि मूर्ख लोक लोभी व कपटाचरणावरच उपजीविका करणारे असतात. आणि ते निर्दोष पुरुषालाच नव्हे तर प्रत्यक्ष बृहस्पतीच्याहि बुद्धीला दोष लावितात. ६३८ बालो युवा च वृद्धश्च यत्करोति शुभाशुभम् ।
तस्यां तस्यामवस्थायां तत्फलं प्रतिपद्यते ।१२।१८१४१५ बाल, तरुण अथवा वृद्ध पुरुष जें जें कांहीं शुभ अथवा अशुभ कर्म करतो, त्याचें फळ त्या त्या अवस्थेत त्याला अवश्य मिळतें. ६३९ बुद्धिमान्वद्धसेवया ॥ ३॥३१३।४८ __ वृद्धांचा समागम केल्याने मनुष्य चतुर होतो. ६४० बुद्धिश्च हीयते पुंसां नीचैः सह समागमात् ।
मध्यमैमध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमैः॥ ३॥१॥३० नीच लोकांच्या संगतीने मनुष्यांची बुद्धि भ्रष्ट होते, मध्यम लोकांच्या संगतीनें तो मध्यम होते, आणि उत्तम लोकांशी सहवास ठेविल्याने उत्तम होते.
For Private And Personal Use Only