Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५९२ पुत्र नात्मावमन्तव्यः पूर्वाभिरसमृद्धिभिः ।। ५।१३५२५
(विदुला माता संजयाला म्हणते ) हे पुत्रा, प्रथमतः आपणापाशी जरी संपत्ति नसली तरी त्याकरितां पुरुषाने स्वतःला दीन समजू नये. ५९३ पुत्रपौत्रोपपन्नोऽपि जननी यः समाश्रितः । ___ अपि वर्षशतस्यान्ते स द्विहायनवच्चरेत् ॥ १२॥२६६।२८
मनुष्य पुत्रपौत्रांनी युक्त असला तरी ज्याला मातेचा आश्रय आहे, तो आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षीच्या शेवटीहि दोन वर्षांच्या लहान मुलाप्रमाणे वागेल ! ५९४ पुत्रस्पर्शात्सुखतरः स्पर्शो लोके न विद्यते ॥ ११७४।५८
पुत्रस्पर्शापेक्षा सुखकर स्पर्श जगांत कोणताच नाही. ५९५ पुत्रः सखा वा भ्राता वा पिता वा यदि वा गुरुः ।
रिपुस्थानेषु वर्तन्तो हन्तव्या भूतिमिच्छता ॥१।१४०५२ पुत्र, मित्र, भाऊ, बाप किंवा गुरु, कोणीहि असो, तो जर शत्रुत्वाने वागत असेल तर त्याचा उत्कर्षेच्छु पुरुषाने वध करावा. ५९६ पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवाः ।
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तमः ॥१२॥५७३३ बापाच्या घरांत जसे मुलगे, तसे ज्याच्या राज्यांत लोक निर्भयपणे संचार करूं शकतात, तो राजा सर्व राजांत श्रेष्ठ होय. ५९७ पुनरावर्तमानानां भग्नानां जीवितैषिणाम् ।
भेतव्यमरिशेषाणामेकायनगता हि ते ॥ ९।५८।१५ जिवाची इच्छा करणारे पण एकदा पराभव पावले असून, पुनः उलटून येणारे असे जे शत्रूकडील उरलेले लोक त्यांचे भय धरावें. कारण, [ मारीन किंवा मरेन एवढा ] एकच विषय त्याच्या दृष्टीपुढे असतो.
For Private And Personal Use Only