Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
Annnnnnnnnnnn~
५७९ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ६।२८।८ (श्रीकृष्ण म्हणतात) सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचे निर्दलन करण्यासाठी, आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगांच्या ठिकाणी मी ( परमेश्वर ) अवतार घेत असतो. ५८० पर्जन्यः पर्वते वर्षन् किं नु साधयते फलम् ।
कृष्ट क्षेत्रे तथा वर्षन् किं न साधयते फलम् ॥ १०।२।५ पाऊस डोंगरावर पुष्कळ पडला तरी त्यापासून कोणते फळ मिळणार ? तोच नांगरलेल्या शेतांत पडला तर कोणते फळ मिळणार नाही ? ५८१ पर्जन्यनाथाः पशवो राजानो मन्त्रिवान्धवाः ।
पतयो बान्धवाः स्त्रीणां ब्राह्मणा वेदबान्धवाः॥५॥३४॥३८ पर्जन्य हा पशूचा बांधव ( हितकर्ता ) होय. राजांचा बांधव प्रधान. स्त्रियांचा बांधव पति, आणि ब्राह्मणांचा बांधव वेद होय. ५८२ पर्यन्शय्या भूमिश्च समाने यस्य देहिनः ।
शालयश्चकदन्नं च यस्य स्यान्मुक्त एव सः॥१२।२८८।३४ पलंगावर पहुडणे व जमिनीवर पडणे ही दोनहि ज्याला सारखींच वाटतात, तसेंच उंची पक्वान्न आणि कदन्न ज्याला सारखेच तो मुक्तच होय. ५८३ पात्रे दानं स्वल्पमपि काले दत्तं युधिष्ठिर ।
मनसा हि विशुद्धेन प्रेत्यानन्तफलं स्मृतम् ॥३२५९।३४ ( व्यासमुनि म्हणतात ) हे युधिष्ठिरा, योग्य ठिकाणी योग्य वेळी शुद्ध मनाने केलेले दान अत्यल्प जरी असले, तरी त्यापासून मरणोत्तर मोठे फळ मिळतें.. ५८४ पानमक्षास्तथा नार्यों मृगया गीतवादितम् ।
एतानि युक्त्या सेवेत प्रसङ्गोह्यत्र दोषवान्॥१२॥१४०२६ __ मद्य, जुगार, त्याचप्रमाणे स्त्रिया, मृगया आणि गाणे बजावणे यांचे जपून सेवन करावें. कारण, यांची चटक लागणे फार वाईट.
For Private And Personal Use Only