Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
mmmmmmmmmmmmmmmmmm
५६७ पकानां हि वधे मूत वज्रायन्ते तृणान्युत ।। ७।११।४८ पक्व झालेल्यांचा वध करण्याच्या कामी तृणाचासुद्धा वज्रासारखा उपयोग होतो. ५६८ पञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे ।
अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते ॥३।३१३।११५ (युधिष्ठिर यक्षाला म्हणतो) पांचव्या अथवा सहाव्या दिवशी का होईना, जो, स्वतःचे घरीच असेल तो भाजीपाला उकडून खातो, ज्याला कोणाचे देणे नाही, आणि ज्याला प्रवास करावा लागत नाही तो, हे यक्षा, आनंदाने राहतो. ५६९ पञ्चेन्द्रियस्य मत्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम् । . ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृतेः पात्रादिवोदकम् ।। ५।३३।७७
मनुष्याच्या पांच इंद्रियांपैकी एकादें जरी ताब्यात नसेल तरी त्याच्या द्वारें, भांड्यांतील पाणी भोकांतून गळून जावे त्याप्रमाणे, त्याची बुद्धि नष्ट होते. ५७० पठकाः पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः ।
सर्वेव्यसनिनोमुखायःक्रियावान्सपण्डितः॥३॥३१३।११० शिकणारे व शिकविणारे तसेच इतर जे कोणी शास्त्राविषयी विचार करतात ते सर्व अभागी, मूर्ख आहेत. जो काही तरी करून दाखवितो तोच खरा शहाणा. ५७१ पण्डितेन विरुद्धः सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् ।
दीघौबुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिसितः।।१२।१४०६८ पंडिताशी विरोध आला असतां, आपण त्याच्यापासून दूर आहो असे समजून निर्भयपणे राहूं नये. कारण बुद्धिमान् पुरुषाचे बाहू [ दिसण्यांत जेवढे दिसतात तेवढे नसून ते ] फार लांब असतात, व त्याला पीडा दिल्यास त्यांच्या योगानें तो पीडा देणाऱ्यांचा वध करतो. ५७२ पतितः शोच्यते राजन्निधनश्चापि शोच्यते ।
विशेषं नाधिगच्छामि पतितस्याधनस्य च ॥१२।८।१५ ( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधानें हळहळतात आणि निर्धनाच्या संबंधानेंहि हळहळतात. मला तर महापातकी आणि दरिद्री यांच्यामध्ये काहीं भेद दिसत नाही.
For Private And Personal Use Only