Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wwwwwwwwwwwwwrrmwar
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ५५६ निरीहो नाश्नुते महत् ॥ ५।१३३३३४
काहीएक उद्योग न करणाऱ्या पुरुषाला मोठेपणा प्राप्त होत नाही. ५५७ निर्मन्युश्चाप्यसंख्येयः पुरुषः क्लीबसाधनः ॥५।१३३॥६
ज्याला कधी राग येत नाही असा नामर्द पुरुष कोणाच्या खिसगणतीत नसतो. ५५८ निर्वनो वध्यते व्याघ्रो नियाघ्रं छिद्यते वनम् ।
तस्माद्वयाघ्रो वनं रक्षेद्वनं व्याघ्रं च पालयेत् ॥५।२९।५५ वन नसेल तर वाघांचा वध होत असतो, आणि ज्यांत वाघ नाहीं तें वनहि लोकांकडून तोडले जाते. यास्तव वाघाने वनाचे रक्षण करावे, आणि वनानेंहि वाघाचें पालन करावें. ५५९ निश्चयः स्वार्थशास्त्रेषु विश्वासश्चासुखोदयः॥१२॥१३९।७०
नीतिशास्त्राचा असा सिद्धांत आहे की, विश्वास हा सर्व दुःखांचे उत्पत्तिस्थान आहे. ५६० निश्चित्य यः प्रक्रमते नान्तर्वसति कर्मणः ।
अवन्ध्यकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते॥५।३३।२४ प्रथम निश्चय केल्यावरच जो कार्य हाती घेतो, कार्य हाती घेतल्यावर ते पार पडल्यावांचून जो स्वस्थ बसत नाही, जो आपला वेळ फुकट घालवीत नाही आणि ज्याचे मन स्वाधीन आहे त्याला पंडित असे म्हणतात. ५६१ निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते ।
अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम् ॥५।३३।१६ जो प्रशस्त कर्माचे आचरण करतो, निंद्य कर्मापासून दूर राहतो [ पुनर्जन्म, परलोक इत्यादिकांविषयीं ] आस्तिक्यबुद्धि धारण करतो, आणि [गुरु, वेदवाक्य इत्यादीवर ] विश्वास ठेवतो तो पंडित होय.
For Private And Personal Use Only