Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
९४
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
५८५ पापानां विद्ध्यधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम । ३।२०७/५८ ( धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणतो ) हे द्विजश्रेष्ठा, सर्व पापांचे आश्रयस्थान लोभ हेच आहे असें जाण.
५८६ पापेभ्यो हि धनं दत्तं दातारमपि पीडयेत् ।
तस्माद्धर्मार्थमनृतमुक्त्वा नानृतभाग्भवेत् || ८|६९/६५
दुष्टांना धन मिळू दिलें असतां त्यापासून देणारालासुद्धां पीडा होते. [ म्हणून चोराला धन कोठें आहे हें सांगण्यापेक्षां खुशाल खोटें सांगावें. ] म्हणून धर्मासाठी खोटें बोललें असतां खोटें बोलण्याचे पाप लागत नाहीं.
५८७ पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
पुत्राश्च स्थाविरे भावे न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥ १३ | ४६।१४ स्त्रीचें कुंवारपणीं बाप रक्षण करितो, तरुणपणीं पति रक्षण करितो, आणि वृद्धपण - मुलगे रक्षण करितात. एवंच, स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाहीं.
५८८ पित्रा पुत्रो वयःस्थोऽपि सततं वाच्य एव तु ।
यथा स्याद्गुणसंयुक्तः प्राप्नुयाच महद्यशः || १ |४२|४ मुलगा मोठा झाला असला, तरी मुद्धां तो सद्गुणी व्हावा आणि त्याला उत्तम प्रकारचें यश लाभावें, म्हणून बापानें त्याला तशा प्रकारचा उपदेश करावा. ५८९ पिवन्त्येवोदकं गावो मण्डूकेषु रुवत्स्वपि ॥१२।१४१।८२ ( तळ्यांतील ) बेडकांनी कितीहि डरांव डरांव केलें तरी गाई पाणी पितातच ! ५९० पुत्र आत्मा मनुष्यस्य भार्या दैवकृतः सखा || ३ | ३१३।७२
पुत्र हाच मनुष्याचा आत्मा होय, आणि भार्या हा देवानें प्राप्त झालेला सखा होय. ५९१ पुत्रं हि मातापितरौ त्यजतः पतितं प्रियम् ।
लोकोरक्षति चात्मानंपश्यस्वार्थस्यसारताम् ||१२|१३८ । १४६
आपला पुत्र प्रिय असूनहि पतित झाला तर आईबापसुद्धां त्याचा त्याग करतात. लोकहि [ इतरांकडे न पाहतां ] स्वतःचें संरक्षण करीत असतात, स्वार्थाचा प्रभाव केवढा आहे पहा !
For Private And Personal Use Only