Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६१७ प्रस्थं वाहसहस्रेषु यात्रार्थ चैव कोटिषु ।
प्रासादे मञ्चकं स्थानं यः पश्यति स मुच्यते॥१२।२८८१३० हजारों नव्हे कोट्यवधि गाडे धान्य पुढे पडलें असतांहि, जो केवळ निर्वाहाला लागणाऱ्या मापटेंभर धान्याचीच अपेक्षा करतो, व ज्याला मोठा राजवाडा रहावयास दिला असतां, एक खाट ठेवण्याइतकीच जागा जो पुरेशी समजतो तो मुक्त होतो. ६१८ प्रहरिष्यन्मियं ब्रयात्महरन्नपि भारत ।
प्रहत्य च कृपायीत शोचेत च रुदेत च ॥ १।१४०५६ (कणिक ब्राह्मण धृतराष्ट्राला सांगतो ) (शत्रूवर ) प्रहार करण्याचे मनांत असतां "वरकरणी त्याच्याशी गोड बोलावे, तसेंच प्रहार करीत असतांहि गोडच बोलावें आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयी सहानुभूति दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेंहि. ६१९ प्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति । - वने काक इवाबुद्धिवाशमानो निरर्थकम् ॥ १२॥११४८
हलका मनुष्य, प्रशंसा करून असो, अथवा निंदा करून असो, करणार काय आहे ? अरण्यांत निरर्थक ओरडणाऱ्या कावळ्याप्रमाणे मंदबुद्धि मनुष्याची स्थिति आहे. ६२० प्राज्ञस्तु जल्पता पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः। ___ गुणवद्वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवाम्भसः ॥ १७४।९१
यथेच्छ बरळणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, पाणी टाकून देऊन दूध ग्रहण करणाऱ्या हंसाप्रमाणे, त्यांतून चांगले बोलणे तेवढे शहाणा मनुष्य घेत असतो. ६२१ प्राज्ञो वा यदि वा मूर्खः सधनो निर्धनोऽपि वा ।
सर्वः कालवशं याति शुभाशुभसमन्धितः॥१२।१५३।४३ शहाणा असो, मूर्ख असो, श्रीमंत असो दरिद्री असो सर्वांना आपआपलें पापपुण्य बरोबर घेऊन काळाच्या स्वाधीन व्हावे लागते. ६२२ प्राणस्यानमिदं सर्व जगन्मं स्थावरं च यत् ।।१२।१०६ स्थावर जंगम जें जें कांही आहे ते सर्व प्राणाचे अन्न होय.
For Private And Personal Use Only