Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६०४ प्रच्छन्नो वा प्रकाशो वा योगो योऽरिं प्रबाधते ।
तद्वै शस्त्रं शस्त्रविदां न शस्त्रं छेदनं स्मृतम् ।।२।५५।९ उघड असो अथवा गुप्त असो, ज्या उपायाने शत्रूचा नाश होत असेल त्या उपायालाच वीरांचे शस्त्र म्हणतात. [हातपाय] तोडणाऱ्या शस्त्राला शस्त्र म्हणत नाहीत. ६०५ प्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः।
एतद्विज्ञानसामर्थ्य न बालैः समतामियात् ॥१२।२०५।३ मानसिक दुःख विवेकाने आणि शारीरिक दुःख औषधानें नाहींसें करावें. अशा प्रकारे दुःखाचा नाश करणे हेच ज्ञानाच्या सामर्थ्याचे लक्षण आहे. [ दुःखाचा परिहार न करितां ] लहान बालकांसारखे वागू नये. ६०६ प्रज्ञा प्रतिष्ठा भूतानां प्रज्ञा लाभः परो मतः ।
प्रज्ञा निःश्रेयसी लोके प्रज्ञा स्वर्गो मतः सताम्।।१२।१८०२ ज्ञान हाच प्राण्यांचा आधार आहे. ज्ञान हाच उत्कृष्ट असा लाभ आहे. लोकांत ज्ञान हेच मोक्षालाहि कारण आहे. ज्ञान हाच प्रत्यक्ष स्वर्ग आहे. असें सत्पुरुषांचें मत आहे. ६०७ प्रतिकूलः पितुर्यश्च न स पुत्रः सतां मतः ।। ११८५।२४
बापाशी जो वैर करतो तो पुत्र सज्जनांना मान्य होत नाही. ६०८ प्रत्युपकुर्वन्बह्वपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्यः ।
एकाकरोतिहिकृतनिष्कारणमेवकुरुतेऽन्यः॥१२।१३८/८२ उपकारांची भरपूर फेड करणारा मूळ उपकार करणाऱ्याच्या बरोबरीचा ठरेल असे वाटत नाही. कां की, एकजण आधी उपकृत झाल्यावर मग [ फेड म्हणून ] करीत असतो, तर दुसरा निरपेक्ष बुद्धीनेच उपकार करतो. ६०९ प्रत्युपस्थितकालस्य सुखस्य परिवर्जनम् ।
__ अनागतसुखाशा च नैव बुद्धिमतां नयः॥१२॥१४०।३६ वेळेवर चालून आलेलें सुख सोडून द्यावयाचे आणि प्राप्त न झालेल्या सुखाची आशा करीत बसावयाचे ही शहाण्यांची रीतच नव्हे.
म. भा. ७
For Private And Personal Use Only