Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५७३ पतिर्हि देवो नारीणां पतिबन्धुः पतिर्गतिः।
पत्या समा गतिनास्ति दैवतं वा यथा पतिः॥१३॥१४६।५५ पति हाच स्त्रियांचा देव, पति हाच वांधव, आणि पति हेच आश्रयस्थान, स्त्रियांना पतीसारखी गति नाही, पति हा खरोखर देवासमान हाय. ५७४ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ।। ६।३३।२६ (भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ) पान, फूल, फळ किंवा नुसते पाणी सुद्धां जो मला ( परमेश्वराला ) भक्तिपूर्वक अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याचे भक्तीने अर्पण केलेले मी स्वीकारीत असतो.. ५७५ परं विषहते यस्मात्तस्मात्पुरुष उच्यते ॥५॥१३३३३५
शत्रूचा पराजय करतो म्हणून पुरुष म्हणतात. ५७६ परं क्षिपति दोषेण वर्तमानः स्वयं तथा । ___ यश्च क्रुध्यत्यनीशानः स च मूढतमो नरः ॥५॥३३॥३७
जो दोष स्वतःचे ठिकाणी आहे त्याच दोषाबद्दल जो दुसऱ्याला नावे ठेवतो, तसेंच आंगीं सामर्थ्य नसतां जो रागावतो तो मनुष्य पराकाष्ठेचा मूर्ख होय. ५७७ परनेयोग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति ।
पन्थानमनुगच्छेयुः कथं तस्य पदानुगाः ॥२।५५।४ ज्याचा पुढारी दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा असतो, त्याचा स्वतःचाच मार्ग चुकतो. मग आणखीहि त्याच्या मागून जाणारांना योग्य मार्ग कसा सांपडावा ? ५७८ परवाच्येषु निपुणः सर्वो भवति सर्वदा ।
.. आत्मवाच्यं न जानीत जानन्नपि च मुह्यति ॥ ८४५१४४ दुस-याचे दोष काढण्यांत सर्वजण प्रवीण असतात. कोणालाही स्वतःचा दोष मात्र समजत नाहीं; आणि समजला तर उमजत नाही.
For Private And Personal Use Only