Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२७८ कृतार्था भुञ्जते दूताः पूजां गृह्णन्ति चैव ह ॥ ५।९१११८
चांगले दूत कामगिरी पार पाडल्यावरच आराम करतात व सत्कार स्वीकारतात. २७९ कृती सर्वत्र लभते प्रतिष्ठां भाग्यसंयुताम् ।
__ अकृती लभते भ्रष्टः क्षते क्षारावसेचनम् ॥१३।६।११ कार्यात सिद्धि पावलेल्या मनुष्याला सर्वत्र मानसन्मान व सद्भाग्य लाभते. यशस्वी न झालेला, जखमेवर खारे पाणी शिंपडावे त्याप्रमाणे तिरस्काराला पात्र होतो. २८० कृपणं विलपन्ना? जरयाभिपरिप्लुतः।
म्रियते रुदतां मध्ये ज्ञातीनां न स पूरुषः॥ ९।५।३४ शरीर जरेने व्यापलेले, व्याधिग्रस्त होऊन करुणपणे विलाप करतो आहे आणि आप्तस्वकीय भोवताली बसून रडत आहेत अशा स्थितीत जो मरण पावतो, तो पुरुषच नव्हे. २८१ कृपणाः फलहेतवः ।।६।२६।४९ __ कर्मफलाची इच्छा करणारे दीन होत. २८२ के न हिंसन्ति जीवान् लोकेऽस्मिन्दिजसत्तम ।
बहु संचिन्त्य इति वै नास्ति कश्चिदहिंसकः॥३२०८६३३ (धर्मव्याध म्हणतो. ) या मर्त्यलोकांत जीवांची हिंसा कोण करीत नाहीत ? या विषयी पुष्कळ विचार केला असतां [ असे दिसून येते की ] खरोखर मुळीच हिंसा • न करणारा कोणीच नाही. २८३ को हि जानाति कस्याद्य मृत्युकालो भविष्यति ।
युवैव धर्मशील स्यादनित्यं खलु जीवितम् ॥१२।१७५।१६ - आज कोणाचा मरणदिवस आहे हे कोण जाणू शकेल ? [ अर्थात् कोणीच नाही. या साठी ] मनुष्याने तरुणपणींच धर्मपरायण व्हावे. कारण, जीवित हे खरोखर क्षणभंगुर आहे.
For Private And Personal Use Only