Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३२० गौरवेण परित्यक्तं निःस्नेहं परिवर्जयेत् ।
सोदर्य भ्रातरमपि किमुतान्यं पृथग्जनम् ॥ १२।२९२।२ सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचे पूर्वीचे महत्त्व जाऊन तो शुष्क पडला, त्याचे द्रव्य संपलें म्हणजे इतर बांधव त्याच्या वान्यासही उभे रहात नाहीत. मग इतर सामान्य लोकांची गोष्ट कशाला ? ३२१ ग्रस्यतेऽकर्मशीलस्तु सदानथुरकिंचनः ॥ १२॥१३९८३
उद्योग न करणाऱ्या दरिद्री मनुष्यावर संकटे नेहमी कोसळत असतात. ३२२ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि वलबद्दढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६३०३४ [ अर्जुन म्हणतो ] हे श्रीकृष्णा, मन हे चंचल, [ इंद्रियांना विषयांकडे । जबरदस्तीने ओढून नेणारें बलिष्ठ आणि दृढ आहे. त्याचा निग्रह करणें हें वाऱ्याची मोट. बांधण्याप्रमाणे मला अत्यंत कठीण वाटते. ३२३ चण्डालत्वेऽपि मानुष्यं
सर्वथा तात शोभनम् ॥ १२।२९७३१ ( पराशर मुनि जनक राजाला म्हणतात ) बाबारे, चांडाळयोनीत का होईना, पण मनुष्याचा जन्म येणे हे सर्वात उत्तम. ३२४ चतुर्वेदोऽपि दुर्वृत्तः स शूद्रादतिरिच्यते ॥३॥३१३।१११
चारी वेद पढलेला असला तरी दुर्वर्तनी असेल तर तो शूद्रापेक्षांहि कनिष्ठ समजावा. ३२५ चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमाः।
उपस्थमुदरं हस्तौ वाक्चतुर्थी स धर्मवित् ॥१२।२९९।२८ ( हंसरूपाने आलेला ब्रह्मदेव म्हणतो.) देव हो, उपस्थ, उदर, हात व चवथी वाणी ही चार द्वारें जो दाबांत ठेवतो तो धर्म जाणणारा होय. ३२६ चराणामचरा ह्यन्नमदंष्ट्रा दंष्ट्रिणामपि ।
आपः पिपासतामन्नमन्नं शूरस्य कातराः ॥ १२।९९।१५ स्थावर पदार्थ हे जंगम प्राण्यांचे अन्न होय. तसेंच दाढा नसलेले प्राणी दाढा असलेल्यांचे. पाणी हे तहानेलेल्यांचे अन्न. तसेंच भित्रे. लोक शूराचे भक्ष्य होत.
For Private And Personal Use Only