Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५१२ नातः पापीयसीं कांचिदवस्थां शम्बरोऽब्रवीत् । __ यत्र नैवाद्य न प्रातर्भोजनं प्रति दृश्यते ॥ ५/७२।२२
आजच्या अथवा उद्यांच्याहि अन्नाची तजवीज ज्या अवस्थेमध्ये दृष्टीस पडत नाही, त्या अवस्थेपेक्षा कोणतीहि अवस्था अधिक दुःखदायक नाही, असें शंबरानेहि सांगितले आहे. ५१३ नात्मच्छन्देन भूतानां जीवितं मरणं तथा ।
नाप्यकाले सुखं प्राप्यं दुःखं वापि यदूत्तम ॥ ५।७२।५० (युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणतो ) हे यदुश्रेष्ठा, प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणे जन्म किंवा मरण येत नाही. तसेंच, सुख काय किंवा दुःख काय, अकाली प्राप्त होत नसते. ५१४ नात्मच्छिद्रं रिपुर्विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य तु ।
गृहेत्कर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः ॥ १२॥१४०।२४ आपले मर्मस्थान शत्रूला समजू देऊ नये. आपण मात्र शत्रूचे मर्मस्थान शोधून काढावें. कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आपल्या शरीरांतच दडवून ठेवतें त्याप्रमाणे राज्याची सर्व अंगें गुप्त राखावी. आणि आपल्या छिद्रांविषयी जपून असावें. ५१५ नात्यन्तं गुणवत्किंचिन्न चाप्यत्यन्तनिर्गुणम् ।
उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा ॥ १२।१५।५० सर्वस्वी गुणसंपन्न असे काही नाही. आणि सर्वथा गुणहीनाह काही नाही. सर्व गोष्टींत बरें व वाईट ही दोनहि असलेली दिसून येतात. ५१६ नादेशकाले किंचित्स्याद्देशकालौ प्रतीक्षताम् ॥३॥२८॥३२
देशकाल अनुकूल नसतां कांही होणार नाही. यास्तव, देशकालाकडे नजर द्यावी. ५१७ नाधनो धर्मकृत्यानि यथावदनुतिष्ठति ।
धनाद्धि धर्मः स्रवति शैलादभि नदी यथा ॥१२।८।२३ ___ द्रव्य नसतां धर्मकृत्ये यथासांग करितां येत नाहीत. पर्वतापासून जशी नदी, तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो.
For Private And Personal Use Only