Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४९७ नहीदृशमनायुष्यं लोके किंचन विद्यते । __ यादृशं पुरुषस्येह परदारोपसेवनम् ॥ १३॥१०४।२१
खरोखर, परस्त्रीगमनाइतकें पुरुषाच्या आयुष्याची हानि करणारे जगांत दुसरें कांहीं नाहीं. ४९८ न हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते ।
गाङ्गो हद इवाक्षोभ्यो यः स पण्डित उच्यते ॥ ५।३३।२६ ___ आपला सन्मान झाला असतां जो आनंद मानीत नाही, अपमान झाला असतां कष्टी होत नाही, आणि गंगेच्या डोहाप्रमाणे ज्याची शांति केव्हाही ढळत नाही त्याला पंडित म्हणतात. ४९९ न ह्यनाढ्यः सखाव्यस्य ॥ १।१३१।६९
दरिद्री श्रीमंताचा मित्र नसतो. ५०० न ह्यनुप्तं प्ररोहति ॥ १३॥१६३।११
पेरल्याविना उगवत नाही. ५०१ न ह्यात्मनः प्रियतरं किंचिद्भूतेषु निश्चितम् ॥ ११७।२७.
प्राणिमात्राला स्वतःपेक्षा प्रिय कांहींच नाही हे निश्चित होय. ५०२ न ह्यात्मस्तवसंयुक्तं वक्तव्यमनिमित्ततः ॥ ११३४१३
आत्मस्तुतीने युक्त असे भाषण कारणावांचून करूं नये. ५०३ न ह्युत्थानमृते दैवं राज्ञामर्थ प्रसाधयेत् ॥ १२॥५६।१४
उद्योगावांचून नुसते दैव राजांचे मनोरथ सिद्धीस नेणार नाही. ५०४ न हृतेऽर्थेन वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः॥ १२॥१६७१२
अर्थाला (द्रव्याला ) सोडून धर्म व काम हे पुरुषार्थ रहात नाहीत अशी श्रुति आहे. ५०५ नाकारो गृहितुं शक्यो बृहस्पतिसमैरपि ॥७१२।१४ मनांतील हेतु छपविणे बृहस्पतीसारख्यांनाहि शक्य नाही.
For Private And Personal Use Only