Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५१८ नाधर्मश्चरितो राजन्सद्यः फलति गौरिव ।
शनैरावय॑मानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति ॥ १।८०२ (शुक्राचार्य वृषपाला म्हणतात.) हे राजा, केलेलें पाप गाईप्रमाणे ताबडतोब फल देत नाही. परंतु ते पुनः पुनः केले जाऊन हळूहळू काची पाळे मुळे खणून काढते. ५१९ नाधर्मो विद्यते कश्चिच्छत्रून्हत्वाततायिनः ।
अधय॑मयशस्यं च शात्रवाणां प्रयाचनम् ॥ ५।३२१ आततायी अशा शत्रूना ठार मारल्याने कसलाहि अधर्म होत नाही. परंतु शत्रूजवळ याचना करणे हे मात्र धर्माविरुद्ध असून कीर्तीला काळिमा लावणारे आहे. ५२० नान्यत्र विद्यातपसोर्नान्यत्रेन्द्रियनिग्रहात् ।
नान्यत्र लोभसंत्यागाच्छान्तिं पश्यामि तेऽनघ ॥५/३६.५१ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे निष्पाप राजा, विद्या व तप यांच्यावांचून, इंद्रियनिग्रहावांचून, आणि लोभाचा सर्वथा त्याग केल्यावांचून तुला शांति प्राप्त होण्याचा अन्य मार्ग दिसत नाही. ५२१ नान्यद्दःखतरं किंचिल्लोकेषु प्रतिभाति मे ।
अर्थविहीनः पुरुषः परैः संपरिभूयते ॥ ३॥१९३।२० (वकमुनि इंद्राला म्हणतात ) लोक द्रव्यहीन पुरुषाचा सर्व प्रकारे अपमान करतात, यापेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट जगात दुसरी कोणतीही असेल, असे मला वाटत नाही. ५२२ नापराधोऽस्ति नारीणां नर एवापराध्यति ।
सवेकायोपराध्यत्वान्नापराध्यन्ति चाङ्गन्नाः १२।२६६१४० स्त्रियांचे पाऊल कुमार्गाकडे वळण्याच्या कामी स्त्रियांचा काहीएक अपराध नाही. या कामी पुरुष हाच सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व बाबतीत पहिली आगळीक पुरुषाकडून होत असल्यामुळे स्त्रीवर्गाकडे दोष येत नाही. ५२३ नापृष्टः कस्यचिढ्यानाप्यन्यायेन पृच्छतः ।
ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत् ॥ १२।२८७३५ कोणी प्रश्न न करितां किंवा अन्यायाने प्रश्न केला असतांही शहाण्या मनुष्याने उत्तर देऊ नये. तर त्यास त्या गोष्टीचे ज्ञान असूनहि त्याने अजाणत्याप्रमाणे गप्प बसावे.
For Private And Personal Use Only