Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४८४ न हि खल्लनुपायेन कश्चिदर्थोऽभिसिध्यति ।
सूत्रजालैर्यथा मत्स्यान्बध्नन्ति जलजीविनः ॥१२।२०३।११ उपाय केल्यावांचून कोणतेंहि कार्य खचित सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचे जाळे टाकूनच माशांना घेरीत असतात. '४८५ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ॥६।२८।३८
खरोखर ज्ञानासारखें पवित्र या जगांत दुसरे काहीच नाही. ४८६ न हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम ।
न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिद्धिस्तु योगतः ॥ १०॥२॥३ [ कृपाचार्य अश्वत्थाम्याला सांगतात ) एकट्या दैवाने किंवा एकट्या उद्योगाने कार्य सिद्धीस जात नसतात. परंतु या दोहोंच्या संयोगानें कोणतेंहि काम साधत असतें. ४८७ न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसपा ।
सत्त्वैः सत्त्वा हि जीवन्ति दुबलैबलवत्तराः॥१२।१५।२० ( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) अहिंसावृत्तीने जगांत जिवंत राहणारा कोणी दिसून येत नाही. खरोखर बलवान् प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात. ४८८ न हि प्रमादात्परमस्ति कश्चित्
वधो नराणामिह जीवलोके । प्रमत्तमा हि नरं समन्तात्
त्यजन्त्यनाश्च समाविशन्ति ॥ १०।१०।१९ या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असें कांहींच नाही. बेसावध राहणाऱ्या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ति सोडून जाते, आणि त्याच्यावर संकटें मात्र कोसळतात.
For Private And Personal Use Only