Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
- ४८९ न हि प्राणात्मियतरं लोके किंचन विद्यते ।
७९
तस्माद्दयां नरः कुर्याद्यथात्मनि तथा परे ||१३|११६ । १२
मृत्युलोकीं प्राणापेक्षां प्रियतर असें कांहींच नाहीं. यास्तव, मनुष्यानें स्वतः प्रमाणेंच · दुसऱ्याविषयीं कळकळ बाळगून दया करावी.
: ४९० न हि बुद्धयान्वितः प्राज्ञो नीतिशास्त्रविशारदः ।
निमज्जत्यापदं प्राप्य महतीं दारुणामपि ।। १२:१३८|४० नीतिशास्त्रनिपुण, बुद्धिमान्, चतुर पुरुष केवढेहि मोठें भयंकर संकट प्राप्त झालें तरी त्यांत बुडून जात नाहीं. ४९१ न हि वैरं महात्मानो विवृण्वन्त्यपकारिषु ।
शनैः शनैर्महाराज दर्शयन्ति स्म ते बलम् || १२|१५७/१०
( भष्म युधिष्ठिराला म्हणतात ) थोर लोक आपला अपकार करणाऱ्याविषयींचें वैर एकदम प्रगट करीत नाहींत. तथापि हळू हळू आपलें सामर्थ्य दाखविल्यावांचून ते रहात नाहींत.
: ४९२ न हि वैराग्निरुद्भूतः कर्म चाप्यपराधजम् ।
शाम्यत्यदग्ध्वा नृपते विना ह्येकतरक्षयात् ।। १२ । १३९/४६
( पूजनी पक्षीण ब्रह्मदत्त राजाला म्हणते ) वैररूपी अग्नि एकदां उत्पन्न झाला म्हणजे तो दग्ध केल्यावांचून शांत होत नाहीं. आणि अपराधजन्य पातक दोहोंतून एकाचा क्षय केल्यावांचून नाश पावत नाहीं.
४९३ न हि वैराणि शाम्यन्ति दीर्घकालधृतान्यपि ॥ ५/७२ ६२ वैर दीर्घ कालपर्यंत धारण केलें तरी सुद्धा नाहींसें होत नाहीं.
४९४ न हि शौर्यात्परं किंचित् ॥ १२/९९/१८
शौर्यापेक्षां श्रेष्ठ कांहींच नाहीं.
४९५ न हि संचयवान्कश्चिदृश्यते निरुपद्रवः || ३|२|४८ कोणीहि संचयी पुरुष उपद्रवरहित असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. ४९६ न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषेण वै || ३ |२८|२७ मनुष्याची अक्कल सर्व बाबतीत चालणें खचित सोपें नाहीं.
For Private And Personal Use Only