Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
३३९ जीवन्भद्राणि पश्यति || ४|३८|४२
कोणी झाला तरी आधीं जगेल तेव्हां मग चांगले दिवस पाहणार ! ३४० ज्ञातयो वर्धनीयास्तैर्य इच्छन्त्यात्मनः शुभम् ||५|३९|१८ स्वतःचें कल्याण व्हावें असें जे इच्छितात त्यांनी अगोदर आपल्या आप्तेष्टांचा उत्कर्ष करावा.
३४१ ज्ञानं तत्त्वार्थसंबोध: || ३ | ३१३।९०
ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा बोध होणें. ३४२ ज्यायांसमपिचेद्वद्धं गुणैरपि समन्वितम् ।
आततायिनमायान्तं हन्याद्धातकमात्मनः || ६ |१०७/१०१ मारण्याच्या इच्छेनें आपल्या अंगावर धांवून येणारा आततायी मनुष्य वयाने मोठा असला, किंबहुना वृद्ध असला, आणि गुणसंपन्न जरी असला तरी त्यास ठार करावें. ३४३ तदा स वृद्धो भवति तदा भवति दुःखितः ।
५५
तदा शून्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते ।। १२/२६६।३० ज्यावेळी मनुष्याला मातेचा वियोग होतो त्यावेळींच तो खरा वृद्ध होतो, त्यावेळींच तो खरा दुःखी होतो आणि त्यावेळींच त्याला सर्व जग शून्य वाटतें ! ३४४ तदेवासनमन्विच्छेद्यत्र नाभिपतेत्परः || ४|४|१३
ज्या ठिकाणीं दुसरा कोणी येणार नाहीं [ व ऊठ म्हणून म्हणणार नाहीं ] अशीच जागा शोधून काढावी.
३४५ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्रेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः || ६ |२८|३४
( श्रीकृष्ण म्हणत 'त हे अर्जुना, ) प्रणाम केल्यानें, परोपरीने प्रश्न विचारिल्यानें आणि सेवा केल्याने तत्त्वद्रष्टे ज्ञानी लोक तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असें समज. ३४६ तपः श्रुतं च योनिश्चाप्येतद्ब्राह्मण्यकारणम् ।
त्रिभिर्गुणैः समुदितस्ततो भवति वै द्विजः ॥ १३।१२१।७ तप, वेदाध्ययन व ब्राह्मणकुलांत जन्म यांच्या योगानें ब्राह्मण्य प्राप्त होतें. या तीन गुणांनी युक्त असेल तरच तो द्विज या संज्ञेला पात्र होतो.
For Private And Personal Use Only