Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५८
सार्यश्रीमहाभारतसुभाषितानि
३५९ त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् || ६ |४०|२१ काम, क्रोध व लोभ हीं तीन आत्मनाश करणारीं नरकाचीं द्वारे होत. तस्मात् या तिहींचाही त्याग करावा.
३६० त्रीण्येव तु पदान्याहुः पुरुषस्योत्तमं व्रतम्
I
न चैव दद्याच सत्यं चैव परं वदेत् || १३ | १२० |१० तीनच गोष्टींना पुरुषाचें उत्तम व्रत असें म्हटलें आहे. त्या म्हणजे, मत्सर करूं नये, दान करावें, आणि श्रेष्ठ असें सत्यच बोलावें. ३६१ त्वमित्युक्तो हि निहतो गुरुर्भवति भारत || ८|६९।८३
( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ) गुरूला ' तूं ' असें संबोधिलें म्हणजे त्याचा वध केल्यासारखेंच झालें. ३६२ दण्ड एव हि राजेन्द्र क्षत्रधर्मो न मुण्डनम् ॥ १२।२३।४७ ( व्यासमुनि युधिष्ठिराला म्हणतात. ) दंडन हाच क्षत्रियाचा धर्म आहे; मुंडन नव्हे ! ३६३ दण्डनीत्यां यदा राजा सम्यक्कात्स्न्र्त्स्न्येन वर्तते ।
तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ।। १२/६९/८०
जेव्हां राजा योग्य रीतीनें आणि पूर्णपणें दंडनीतीच्या अनुरोधानें चालतो, तेव्हां कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.
३६४ दण्डचेन भवेल्लोके विनश्येयुरिमाः प्रजाः ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलान्बलवत्तराः ।। १२।१५।३०
जगांत जर दंड नसता तर प्रजा नाश पावल्या असत्या. पाण्यांतील माशांप्रमाणे बलवत्तर लोकांनीं दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.
३६५ दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति ।
दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः || १२|१५|२ दंड हाच सर्व प्रजेला वळण लावतो. दंडच सर्वांचें रक्षण करतो. सर्व लोक झोपीं गेले तरी दंड जागा राहतो. म्हणूनच दंड हाच धर्म आहे असें ज्ञानी लोक समजतात..
For Private And Personal Use Only