Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४०५ धर्मश्च सूक्ष्मो निपुणोपलक्ष्यः ॥ २॥६७।३८
सूक्ष्म अशा धर्माचे बारकाईने परीक्षण करावें. ४०६ धर्मश्चार्थेन महता शक्यो राजनिषेवितुम् ॥ ३॥३३॥४८
(भीम युधिष्ठिराला म्हणतो ) हे राजा, धर्माचे आचरण विपुल द्रव्याच्याच योगाने करता येणे शक्य आहे. ४०७ धर्मस्य निष्ठात्वाचारस्तमेवाश्रित्य भोत्स्यसे॥१२।२५९।६
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) धर्माचा आधार आचार होय. त्याचाच आश्रय केल्यावर तुला धर्माचे ज्ञान होईल. ४०८ धर्मः सत्यं तथा वृत्तं बलं चैव तथाप्यहम् ।
शीलमूला महाप्राज्ञ सदा नास्त्यत्र संशयः॥१२।१२४१६२ [ लक्ष्मी प्रहादास म्हणते ] धर्म, सत्य तसेच सद्वर्तन, सामर्थ्य आणि मी ( लक्ष्मी ) या सर्वांचे मूळकारण शील हेच होय यांत संशय नाही. ४०९ धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम् ।
न तत्सेवेत मेधावी न तद्धितमिहोच्यते ॥ १२॥२९३८ धर्माला सोडून असलेले कृत्य केवढेहि मोठे फल देणारे असले तरी ते शहाण्याने करू नये. कारण त्यापासून खरें कल्याण होत नाही. ४१० धर्माय राजा भवति न कामकरणाय तु ॥ १२।९०३
धर्मरक्षणासाठी राजाची उत्पत्ति आहे, आपल्या इच्छा तृप्त करून घेण्यासाठी नव्हे. ४११ धर्मार्थकामकुशलो धर्मार्थावप्यपीडयन् ।
धर्मप्रधानकार्याणि कुर्याश्चेति पुनःपुनः ।। ७१५११३७ (द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगतात ) तूं धर्म, अर्थ व काम यांविषयी कुशल आहेस. परंतु, धर्म व अर्थ या दोहोंसहि धक्का न लागू देतां धर्मप्रधान अशीच कृत्यें करीत जा, हे मी तुला पुनः पुनः सांगतो.
म. भा. ५
For Private And Personal Use Only