Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ४१७ धर्मे ते धीयतां बुद्धिर्मनस्तु महदस्तु च ॥ १५॥१७॥२१
(कुंती युधिष्ठिराला म्हणते ) तुझी बुद्धि धर्माच्या ठिकाणी स्थिर होवो, आणि तुझें मन मोठे असो.. ४१८ धर्मे मतिर्भवतु वः सततोत्थितानां
स ह्येक एव परलोकगतस्य बन्धुः। अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना
नैवाप्तभावमुपयान्ति न च स्थिरत्वम् ॥ १।२।३९१ ( सौति शौनकादिक ऋषींना सांगतो ) सतत प्रयत्नपूर्वक धर्मानुष्ठान करण्याकडे तुमची प्रवृत्ति असू दे. कारण तोच एकटा परलोकी गेल्यावर आपल्या उपयोगी पडणारा आहे. कनक आणि कांता यांची दक्षतेने सेवा केली तरी ती कामास येत नाहीत, ती चिरकाल टिकतहि नाहीत. ४१९ धर्मेऽसुखकला काचिद्धर्मे तु परमं सुखम् ॥१२॥२७११५६ __ धर्माचरणांत थोडेसे कष्ट वाटले तरी अत्यंत श्रेष्ठ सुख धर्मातच आहे. ४२० धर्मो हि परमा गतिः ॥ १२॥१४७८
धर्म हाच उत्कृष्ट प्रकारच्या गतीचे साधन होय. ४२१ धम्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्
क्षत्रियस्य न विद्यते ॥ ६।२६।३१ धर्मयुद्धासारखें श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरे काहीच नाही. ४२२ धारणाद्धर्ममित्याहुधर्मेण विधृताः प्रजाः ।
यः स्याद्धारणसंयुक्तःस धर्म इति निश्चयः॥१२॥१०९।११ धारण करतो म्हणून धर्म म्हणतात. धर्मानेच लोकांना धारण केले आहे. धारण करण्याच्या गुणानें जो युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे. ४२३ धिक्तस्य जीवितं राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति ।
अवृत्त्यान्यमनुष्योऽपियो वैदेशिक इत्यपि ॥१२॥१३०३४ ज्याचे राष्ट्र क्षीण दशेप्रत पावते आणि परदेशांत राहणारा अन्य मनुष्यहि ज्याच्या -राष्ट्रांत उपजीविका न झाल्यामुळे नाश पावतो त्या राजाच्या जीविताला धिक्कार असो!
For Private And Personal Use Only