Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारत सुभाषितानि
४६६ न ब्रह्मचार्यधीयीत कल्याणीं न दुहेत गाम् ।
न कन्योद्वहनं गच्छेद्यदि दण्डो न पालयेत् ॥ १२।१५ ३७ जर दंड लोकांचें संरक्षण न करता तर ब्रह्मचा-यानें अध्ययन केलें नसतें. सवत्सा नूनें दूध दिलें नसतें; आणि मुलीनें विवाह करून घेतला नसता. ४६७ न लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया ।
अपि चापिहितःश्वभ्रे कृतविद्यः प्रकाशते ।। १२।२८७।३१ लोकांत नुसत्या आत्मप्रौढीनें मूर्खाचें तेज पडत नाहीं. परंतु जो खरा खरा विद्वान् आहे त्याला एखाद्या बिळांत कोंडून ठेविलें, तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाहीं. ४६८ नवनीतं हृदयं ब्राह्मणस्य
वाचि क्षुरो निशितस्तीक्ष्णधारः ।
७५
तदुभयमेतद्विपरीतं क्षत्रियस्य
वाङ्नवनीतं हृदयं तीक्ष्णधारमिति || १।३।१२३
ब्राह्मणाचे हृदय लोण्यासारखें मऊ असतें, परंतु बोलण्यांत तीक्ष्ण धारेच्या पाजवलेल्या वस्तऱ्यासारखा तो कठोर असतो. क्षत्रियाच्या या दोनहि गोष्टी उलट असतात. म्हणजे बोलणें मृदु पण हृदय कठीण.
४६९ न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत् ।
विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति || ५|३८|९
अविश्वासू माणसावर विश्वास ठेवू नये. विश्वासू मनुष्यावर देखील अति विश्वास टाकू नये. कारण, विश्वास ठेविल्यामुळे जर कांहीं भय उत्पन्न झालें, तर तें आपली पाळेमुळे खणून काढतें.
४७० न वै मानं च मौनं च सहितौ वसतः सदा ।
अयं हि लोको मानस्य असौ मौनस्य तद्विदुः || ५|४२|४४ मान व मौन हीं सर्वदा एकत्र रहात नाहींत. हा लोक मानाचा असून परलोक मौनाचा आहे असें म्हणतात.
( अन्न, स्त्री इत्यादि भोगांचे ठिकाणीं जो अभिलाष त्याला 'मान' असें म्हणतात. - आणि ब्रह्मानंदसुखाच्या प्राप्तीचें जें कारण त्याला 'मौन' असें म्हणतात. )
For Private And Personal Use Only