Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
४५९ न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम् ॥१२।२५।२३ कोणालाहि नेहमींच दुःख होत नाहीं, किंवा नेहमींच सुख होत नाहीं. ४६० न निर्मन्युः क्षत्रियोऽस्ति लोके निर्वचनं स्मृतम् ||३|२७|३७ ज्याला अपमानाची चीड येत नाहीं तो क्षत्रिय नव्हे, अशी लोकांत म्हणच आहे. ४६१ न पश्यामोऽनपकृतं धनं किंचित्कचिद्वयम् || १२|८|३०
( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) दुसऱ्याला यत्किंचितहि उपद्रव न देतां कोणाला केव्हां कांहीं धन मिळल्याचे आमच्या पाहण्यांत नाहीं. ४६२ न पूर्वे नापरे जातु कामानामन्तमाप्नुवन् ॥१२।१७७ २२ पूर्वकाळचे किंवा दुसरे कोणतेहि लोक इच्छेच्या अंतापर्यंत पोंचले नाहींत. ४६३ न बाह्यं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति भारत ।
शारीरं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति वा न वा ।। १२।१३।१ ( सहदेव युधिष्ठिराला म्हणतो ) बाह्य द्रव्याचा त्याग केल्यानें सिद्धि प्राप्त होत नसते. शरीरांत राहणाऱ्या [ कामक्रोधादिविकाररूप ] द्रव्याचा त्याग करूनहि सिद्धि मिळेल का नाहीं हा प्रश्नच आहे.
४६४ न बुद्धिर्धनलाभाय न जाड्यमसमृद्धये ।
लोकपर्यायवृत्तान्तं प्राज्ञो जानाति नेतरः || ५|३८|३३
बुद्धि असली म्हणजे धन मिळतें असें नाहीं, आणि बुद्धिमांद्य असले म्हणजे दारिद्र्य येतें असेंहि नाहीं. लोकव्यवहार हा चतुर पुरुषालाच समजतो, इतरांना नाहीं. ४६५ न बुद्धिशास्त्राध्ययनेन शक्यं
प्राप्तुं विशेषं मनुजैरकाले । मूर्खोऽपि चामोति कदाचिदर्थान्
कालो हि कार्यं प्रति निर्विशेषः || १२/२५/६
काळ प्रतिकूल असतां नुसत्या बुद्धिमत्तेने किंवा शास्त्राभ्यासानें मनुष्याला विशेषसा लाभ होणें शक्य नाहीं. उलट, एकादे वेळेस मूर्खालासुद्धां कार्यात यश येते. तस्मात् काळ हाच कार्यसिद्धीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा आहे.
For Private And Personal Use Only