Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४५३ न दृष्टपूर्व प्रत्यक्षं परलोकं विदुर्बुधाः ।
आगमांस्त्वनतिक्रम्य श्रद्धातव्यं बुभूषता ॥ १२।२८।४२ परलोक हा पूर्वी कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे असें शहाणे लोक समजत नाहीत. परंतु शास्त्रमार्गाचे उल्लंघन न करितां उत्कर्षेच्छु पुरुषाने त्याविषयीं श्रद्धा ठेवावी. ४५४ न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् ।
यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्धया संविभजन्ति तम् ५।३५।४० देव काही एकाद्या गुराख्याप्रमाणे हातांत दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत. तर ज्याचे रक्षण करण्याची त इच्छा करतात, त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धि देतात. ४५५ न देवैरननुज्ञातः कश्चिद्भवति धार्मिकः ॥ १२।२७१।४९
देवांची तशी इच्छा असल्याशिवाय कोणी धार्मिक बनत नाही. ४५६ न द्वितीयस्य शिरसश्छेदनं विद्यते कचित् ।
नच पाणेस्तृतीयस्य यन्नास्तिन ततोभयम्॥१२॥१८०।२९ __ आपले दुसरें डोके कोणी कापील किंवा तिसरा हात तोडील अशी केव्हांहि भीति नसते. कां की, जे मूळातच नाही त्याची भीति मुळीच नसते. ४५७ न धर्मः प्रीयते तात दानदत्तमहाफलैः॥
न्यायलब्धैर्यथा सूक्ष्मः श्रद्धापूतः स तुष्यति॥१४।९०९९ (धर्म उंछवृत्तीच्या ब्राह्मणाला म्हणतो ) बाबारे, न्यायाने मिळविलेल्या आणि श्रद्धेनें पवित्र झालेल्या थोड्याशा द्रव्याच्या दानाने धर्म जसा संतुष्ट होतो, तसा केवळ मोठे फळ देणाऱ्या दानांनी संतोष पावत नाही. ४५८ न धर्मपर एव स्यान्न चार्थपरमो नरः।
न कामपरमो वा स्यात्सर्वान्सेवेत सर्वदा ॥ ३॥३३॥३९ मनुष्याने केवळ धर्माचेंच अवलंबन करूं नये, एकट्या अर्थाच्याच पाठीमागे लागू • नये आणि नुसत्या कामाकडेही सर्व लक्ष्य देऊ नये. परंतु, [ धर्म, अर्थ व काम ] या सर्वोचें सर्वदा सेवन करावे.
For Private And Personal Use Only