Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
www
nomwww
४४७ न तथेच्छन्ति कल्याणान्परेषां वेदितुं गुणान् ।
यथैषां ज्ञातुमिच्छन्ति नैर्गुण्यं पापचेतसः ॥५॥३७॥४७ दुष्ट मनुष्यांना दुसऱ्यांचे दोष जाणण्याची जशी इच्छा असते, तशी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याची इच्छा नसते. ४४८ न तल्लोके द्रव्यमस्ति यल्लोकं प्रतिपूरयेत् ।।
समुद्रकल्पः पुरुषो न कदाचन पूर्यते ॥ १३९३४६ जगांत असे कोणतेच द्रव्य नाहीं की, जे लोकांना पुरून उरेल. मनुष्य हा समुद्रासारखा आहे. त्याला कधीच कांहीं पुरत नाही. ४४९ न तृप्तिः प्रियलाभेऽस्ति तष्णा नाद्भिः प्रशाम्यति ।
संप्रज्वलति सा भूयः समिद्भिरिव पावकः॥१२॥१८०२६ प्रिय वस्तूचा लाभ झाल्याने तृप्ति होते असे नाही. तृष्णा ( हांव, लोभ ) ही पाण्याने शांत होत नाही. समिधांनी जसा अग्नि, तशी ती [ इष्टप्राप्तीनें ] अधिकच प्रज्वलित होते. ४५० न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
बालोऽपि यःप्रजानाति तं देवाः स्थविरं विदुः।।३।१३३।११ एकाद्याचे केस पांढरे झाले म्हणजे तेवढ्यानें तो वृद्ध झाला असे नाही. वयाने लहान असला तरी, जो ज्ञानी आहे त्यालाच देव वृद्ध समजतात. ४५१ न त्वेवात्मावमन्तव्यः पुरुषेण कदाचन ।
न ह्यात्मपरिभूतस्य भूतिभवति शोभना ।। ३३२।५८ पुरुषाने स्वतःस केव्हांहि हीन लेखू नये कारण, स्वतःस हीन मानणारास उत्तम प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत नाही. ४५२ न दरिद्रो वसुमतो नाविद्वान्विदुषः सखा ।
न शूरस्य सखा क्लीवः सखिपूर्व किमिष्यते ॥१११३१९ (द्रुपदराजा द्रोणाचार्यांना म्हणतो) दरिद्री हा श्रीमंताचा अथवा मूर्ख हा विद्वानाचा मित्र नसतो. शूराची नामर्दाशी मैत्री असणे शक्य नाही. तर सख्यपूर्वक तूं काय मागतोस?
For Private And Personal Use Only