Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww ४३५ न गृहं गृहमित्याहुहिणी गृहमुच्यते।
गृहं तु गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम् ॥ १२॥१४४६ नुसत्या घराला घर म्हणत नाहीत. गृहिणी हेच घर. गृहिणी नसलेलें घर अरण्यासमान होय. ४३६ न च कश्चित्कृते कार्ये कोरं समवेक्षते ॥१२॥१३८।११२
कार्य होऊन गेल्यावर कर्त्याकडे कोणाचें लक्ष्य जात नाही. ४३७ न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ।
अल्पोऽपि हि दहत्यनिर्विषमल्पं हिनस्ति च ॥१२॥५८।१७ __ स्वतः बलाढ्य असलेल्यानेसुद्धां दुर्बळ अशाहि शत्रूला तुच्छ समजू नये. कां की, अमि लहान असला तरी जाळल्यावांचून रहात नाही, आणि विष थोडे असले तरी प्राणनाश करतेंच. ४३८ न च शुद्धानृशंसेन शक्यं राज्यमुपासितुम् ।।१२।७५/१८
निर्भेळ दयाळूपणाने राज्य चालविणे शक्य नाही. ४३९ न चैव पुरुषो द्रष्टा स्वर्गस्य नरकस्य च । ___आगमस्तु सतां चक्षुर्नृपते तमिहाचर ।।१२।२८।५४
( अश्म नामक ब्राह्मण जनक राजाला सांगतो ) हे राजा, स्वर्ग आणि नरक मनुष्याला दिसत नाहीत. परंतु त्यांना अवलोकन करण्याचे सज्जनांचे नेत्र म्हणजे शास्त्र होय. म्हणून तूं शास्त्रप्रमाणे वाग. ४४० न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ॥ १७५.५० इच्छित वस्तूंच्या उपभोगाने भोगेच्छेची तृप्ति कधीच होत नसते. आहुतींच्या योगाने अधिक पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे ती उलट अधिकच वाढते. ४४१ न जातु त्वमिति ब्रूयादापन्नोऽपि महत्तरम् । ___ त्वंकारोवा वधो वेति विद्वत्सु न विशिष्यते ॥ १३॥१६२१५३
संकटांत असतांनाहि मोठ्या मनुष्याला 'तूं' असें एकेरी संबोधू नये. विद्वानाला तूं असें म्हणणे व त्याचा वध करणे सारखेच..
For Private And Personal Use Only