Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४२९ न कश्चित्कस्यचिन्मित्रं न कश्चित्कस्यचित्सुहृद ।
अर्थतस्तु निबध्यन्ते मित्राणिरिपवस्तथा॥१२॥१३८।११० मुळांतच कोणी कोणाचा मित्र नसतो, आणि कोणी कोणाचा शत्रुहि नसतो. कार्याच्याच अनुरोधाने मित्र आणि शत्रु हे होत असतात. ४३० न कश्चिन्नापनयते पुमानन्यत्र भार्गवात् ।
शेषसंप्रतिपत्तिस्तु बुद्धिमत्स्वेव तिष्ठति ॥५॥३९॥३० [ नीतिशास्त्रप्रणेत्या | शुक्राचार्यांव्यतिरिक्त दुसरा कोणीहि मनुष्य कधी चुकत नाहीं असें नाही. परंतु चूक झाल्यावर पुढे काय याचा विचार करण्याची अक्कल बुद्धिमान पुरुषांच्याच ठायी असते. ४३१ न कालो दण्डमुद्यम्य शिरः कुन्तति कस्यचित् ।
कालस्य बलमेतावद्विपरीतार्थदर्शनम् ॥ २।८।११ विनाशकाल प्राप्त झाला म्हणजे तो काही प्रत्यक्ष दंड उगारून कोणाचे डोकें उडवीत नाही. तर बुद्धीत अंश पाडून विपरीत प्रकार भासविणे एवढ्यापुरताच तो आपल्या बळाचा उपयोग करतो. ४३२ न कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मतिः।
अन्तेष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते ।५।३४१४१ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) दुर्वर्तनी माणसाच्या कुलीनपणाला काही किंमत देता येत नाही असे मला वाटते. हीन कुळांत जन्मलेल्यांच्यासुद्धां शीलालाच महत्त्व आहे. ४३३ न कृतस्य तु कर्तुश्च सख्यं संधीयते पुनः ।
हृदयं तत्र जानाति कतुश्चैव कृतस्य च ॥ १२॥१३९।३६ अपराध करणारा आणि त्याचे प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्ये पुनरपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा संबंध काय आहे हे प्रायश्चित्त देणारा व अपराध करणारा ह्या उभयतांचे अंतःकरणच जाणत असते. ४३४ न कोशः शुद्धशौचेन न नृशंसेन जातुचित् ।
मध्यमं पदमास्थाय कोशसंग्रहणं चरेत् ॥१२॥१३३३३ अगदी सोवळेपणाने राहून संपत्ति मिळत नसते; तशीच ती दुष्टपणानेही कधीच मिळत नाही. यास्तव मध्यम मार्गाचा अवलंब करून संपत्तीचा संग्रह करावा.
For Private And Personal Use Only