Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४२४ धृमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च
धृतराष्ट्रोल्मकानीव ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५॥३६६० (विदुर म्हणतो ) हे भरतश्रेष्टा धृतराष्ट्रा, लाकडाची कोलितें एकएकटी असली म्हणजे नुसती धुमसत राहतात; पण तीच एकत्र असली म्हणजे त्यांच्यापासून ज्वाला उत्पन्न होते. त्याचप्रमाणे नातलगांची गोष्ट आहे. ४२५ धूमो वायोरिव वशे बलं धर्मोऽनुवर्तते । ___ अनीश्वरो बले धर्मो द्रुमे वल्लीव संश्रिता ॥ १२॥१३४१७.
धूर वाऱ्याच्या अंकित राहतो तसा धर्म बळाच्या पाठोपाठ येतो. वृक्षाच्या आश्रयाने राहणाऱ्या लतेप्रमाणे धर्म बळावर अवलंबून असतो. ४२६ धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरात्मा
धैर्य शौर्य देशकालाप्रमादः । अल्पस्य वा बहुनो वा विवृद्धौ ।
धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि ॥ १२॥१२०३७ संथपणा, दक्षता, मनोनिग्रह, बुद्धिमत्ता, विचारशीलता, धैर्य, शौर्य आणि स्थळकालाविषयीं सावधगिरी, ही आठ साधनें मूळचे थोडे किंवा पुष्कळ असलेलें धन वाढविण्याची होत. ४२७ धेनुवेत्सस्य गोपस्य स्वामिनस्तस्करस्य च
पयः पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चयः॥१२।१७४।३२ गाईवर वासराची, गवळ्याची, मालकाची व (प्रसंगविशेषीं ) चोराचीहि सत्ता असते. पण ज्याला तिचे दूध प्राशन करण्यास मिळते त्याचाच तिजवर खरा हक्क होय हे निश्चित. ४२८ न कश्चिजात्वतिक्रामेजरामृत्यू हि मानवः ।
अपि सागरपर्यन्तां विजित्येमा वसुंधराम् ॥१२।२८।१५ समुद्रवलयांकित ही सर्व पृथ्वी जिंकूनसुद्धां कोणीहि मनुष्य जरा आणि मृत्यु यांचे अतिक्रमण करूं शकत नाही.
For Private And Personal Use Only