Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
३९२ धनेन किं यन्न ददाति नाश्नुते बलेन किं येन रिपुं न बाधते । श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत्
६३
किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी ।। १२।३२१/९३
ज्याचा दान करण्याकडे किंवा भोगण्याकडे उपयोग केला जात नाहीं तें धन काय कामाचें ? ज्याच्या योगानें शत्रूला त्रास दिला जात नाहीं त्या बळाचा काय उपयोग ? धर्मानुष्ठान नाहीं तर विद्येची काय किंमत आणि जो जितेंद्रिय, मनोनिग्रही नाहीं तो जीव काय करावयाचा ? ३९३ धनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रमपिधीयते ।
असंवृतं तद्भवति ततोऽन्यदवदीयते || ५|३५/७०
अन्यायाने मिळविलेल्या द्रव्याने एकादें व्यंग झांकलें तर तें खरोखर झांकलें जात नाहींच, परंतु त्यापासून आणखीहि एक उत्पन्न होतें. ३९४ धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम् ।
लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा || ३ | ३१३।७४ धन मिळविण्याच्या साधनांत दक्षता सर्वांत श्रेष्ठ आहे. धनांमध्ये उत्तम धन विद्या. सर्व लाभांत उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य. आणि सर्व सुखांत संतोष श्रेष्ट. ३९५ धर्म एको मनुष्याणां सहायः पारलौकिकः । १३।१११।१७ एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकांतील सोबती आहे.
३९६ धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । ३।३१३।१२८
आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपला घात करतो. आणि आपण धर्माचें रक्षण केलें तर धर्म आपले रक्षण करतो.
३९७ धर्मं यो बाधते धर्मो न स धर्मः कुवर्त्म तत् ।
अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम ||३|१३१।११ ( ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो ) ज्याच्या योगानें खऱ्या धर्माला बाध येतो तो धर्मच नव्हे, तो कुमार्ग होय. ज्याचा खऱ्या धर्माशीं विरोध येत नाहीं तोच धर्म.
For Private And Personal Use Only