Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३८७ द्यक्षरस्तु भवेन्मृत्युस्यक्षरं ब्रह्म शाश्वतम् ।
ममेति च भवेन्मृत्युन ममेति च शाश्वतम् ॥१२।१३।४ दोन अक्षरे म्हणजे मृत्यु व तीन अक्षरे म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. 'मम' म्हणजे माझे असें मानिल्याने मृत्यु, आणि 'न मम' म्हणजे माझें नव्हे असे मानिल्याने शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होते. ३८८ धनं लभेत दानेन मौनेनाज्ञां विशांपते ।
उपभोगांश्च तपसा ब्रह्मचर्येण जीवितम् ॥ १३७।१४ दान करून धन मिळवावें, मौनाने, लोकांनी आपल्या आज्ञेप्रमाणे वागणे, तपश्चर्येने उपभोग आणि ब्रह्मचर्याने ( दीर्घ ) जीवित ही प्राप्त करून घ्यावी, ३८९ धननाशेऽधिकं दुःखं मन्ये सर्वमहत्तरम् ।
ज्ञातयोह्यवमन्यन्ते मित्राणि च धनाच्युतम्॥१२॥१७७३४ (वैराग्य संपन्न मंकि म्हणतो) मला वाटते, द्रव्यनाशाचे दुःख सर्वात अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रहि द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात. ३९० धनमाहुः परं धर्म धने सर्व प्रतिष्ठितम् ।
जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नराः॥५/७२।२३ धन मिळविणे हा श्रेष्ठ धर्म होय असे म्हणतात. धनावरच सर्व काही अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यांतच जमा. ३९१ धनात्कुलं प्रभवति धनाद्धर्मः प्रवर्धते ।
नाधनस्यास्त्ययं लोको न परः पुरुषोत्तम ॥ १२।८।२२ (अर्जुन युधिष्ठराला म्हणतो ) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक,
For Private And Personal Use Only