Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६ ४
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
३९८ धर्म संहरते तस्य धनं हरति यस्य सः ।
हियमाणे धने राजन्वयं कस्य क्षमेमहि || १२/८/१३
( भीम युधिष्ठिराला म्हणतो. ) जो ज्याचें द्रव्य हरण करतो त्यानें त्याच्या धर्माचाच उच्छेद केल्यासारखें होतें राजा, आमच्या द्रव्याचा अपहार होऊ लागला तर आम्ही कोणाला क्षमा करावी काय ?
३९९ धम हि यो वर्धयते स पण्डितो
य एव धर्माच्च्यवते स मुह्यति ||१२|३२१/७८
धर्माची जो वाढ करतो तोच पंडित जो धर्मापासून च्युत होतो तो मोहांत सांपडला असें समजावें.
४०० धर्मनित्यास्तु ये केचिन्न ते सीदन्ति कर्हिचित् ॥ ३।२६३।४४ सदोदित धर्माने जे वागतात त्यांचा कधींहि नाश होत नाहीं. ४०९ धर्ममूलः सदैवार्थः कामोऽर्थफलमुच्यते || १२|१२३|४ केव्हां झालें तरी अर्थप्राप्तीचें मूळ धर्म होय. काम ( म्हणजे इष्टप्राप्ति ) हें अर्थाचें फळ होय.
४०२ धर्म पुत्र निषेवस्व सुतीक्ष्णौ च हिमातपौ ।
क्षुत्पिपासे च वायुं च जय नित्यं जितेन्द्रियः । १२।३२१।४
( व्यास मुनि शुकाला सांगतात. ) हे पुत्रा, तूं धर्माचरणानें वाग. नेहमीं जितेंद्रिय राहून कडक थंडी व ऊन, तहान व भूक, आणि ( म्हणजे सहन करण्यास शीक ).
प्राणवायु यांना जिंक
४०३ धर्म पूर्वे धनं मध्ये जघन्ये काममाचरेत् । अहन्यनुचरेदेवमेष शास्त्रकृतो विधिः || ३|३३|४०
दिवसाच्या पूर्वभागांत धर्मानुष्ठान, मध्यभागांत द्रव्यसंपादन व शेवटल्या भागांत विषयसेवन करावें. याप्रमाणे प्रत्यहीं वागावें हा शास्त्रोक्त विधि आहे. ४०४ धर्मव्युच्छित्तिमिच्छन्तो येऽधर्मस्य प्रवर्तकाः ।
हन्तव्यास्ते दुरात्मानो देवैर्दैत्या इवोल्बणाः || १२|३३|३०
जे धर्माचा उच्छेद करूं पाहतात व अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्यांना. देवानीं महाभयंकर अशा दैत्यांना ठार मारिलें त्याप्रमाणे, ठार मारावें.
For Private And Personal Use Only