Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३६६ दण्डस्यैव भयादेके न खादन्ति परस्परम् ।
__ अन्धे तमसि मज्जेयुयदि दण्डो न पालयेत् ॥१२।१५।७ दंडाच्याच भीतीमुळे काही प्राणी परस्परांना खाऊन टाकीत नाहीत. जर दंडशक्तीने लोकांचे रक्षण केले नाही तर ते घोर अंधकारांत बुडून जातील. ३६७ दत्तभुक्तफलं धनम् ॥ ५/३९/६७ ___ दान करणे व भोग्य वस्तूंचा उपभोग घेणे हे धनाचें फळ होय. ३६८ दया सर्वसुखैषित्वम् ॥ ३॥३१३।९०
दया म्हणजे सर्वांना सुख व्हावे अशी इच्छा. ३६९ दर्पो नाम श्रियः पुत्रो जज्ञेऽधमादिति श्रुतिः॥१२।९०।२६
दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे; तो तिला अधर्मापासून झाला असें ऐकण्यात येते. ३७० दाक्ष्यमेकपदं धर्म्य दानमेकपदं यशः।
सत्यमेकपदं स्वयं शीलमेकपदं सुखम् ॥ ३॥३१३७० दक्षता हेच धर्माचे मुख्य कारण होय. दान हेच यशःप्राप्तीचे मुख्य साधन होय. सत्य हेच स्वर्गप्राप्तीचे मुख्य साधन हाय.आणि शील हेच सुखाचे मुख्य निधान होय. ३७१ दानपथ्यौदनो जन्तुः स्वकर्मफलश्नुमते ॥ १२॥२९८१३९
दान हेच मनुष्याला परलोकींच्या मार्गात शिदोरीप्रमाणे उपयोगी पडते. प्राण्याला स्वतःच्याच कर्माचे फळ मिळत असते. ३७२ दानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम् ।
न पीणयति भूतानि निव्यञ्जनमिवाशनम् ॥ १२८४७ दान झाले तरी गोड शब्द बोलून केलें नाही, तर ते, तोंडी लावण्यावांचून दिलेल्या भोजनाप्रमाणे लोकांच्या मनाला आनंद देत नाही. ३७३ दानं मित्रं मरिष्यतः ॥ ३३१३६४ दान हा मरणोन्मुख झालेल्याचा मित्र होय.
For Private And Personal Use Only