Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३५३ तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् । धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
५७
महाजनो येन गतः स पन्थाः || ३ | ३१३।११७
[ धर्मतत्त्वाचा विचार करूं लागलें असतां ] युक्तिवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्यें "पहावीं तर ती निरनिराळ्या प्रकारचीं आहेत, ज्याचें मत सर्वाना प्रमाण आहे असा एकहि ऋषि आढळून येत नाहीं. तात्पर्य, धर्माचं तत्त्व गुहेत दडलेले आहे ( म्हणजे अत्यंत गूढ आहे ) अशा स्थितीत, थोर लोक ज्या मार्गाने गेले तोच मार्ग उत्तम ! ३५४ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ || ६ |४०|२४
( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, कार्य कोणतें, अकार्य कोणतें याचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्रच प्रमाण मानिलें पाहिजे.
३५५ तृणानि भूमिरुदकं वाक्चतुर्थी च सूनृता ।
सतामेतानि गेहेषु नोच्छिद्यन्ते कदाचन || ५|३६|३४
गवताचें आसन, स्वच्छ जागा, पाणी आणि चौथे सत्य व प्रिय भाषण या चार - गोष्टींची तरी सज्जनांच्या घरीं केव्हांहि वाण पडत नाहीं. ३५६ तेजसोर्हि द्वयोर्देवाः सख्यं वै भविता कथम् || ५|१०|२२
[ ' तूं इंद्राशी सख्य कर' असे सांगण्याकरितां आलेल्या देवांना वृत्रासुर म्हणतो ] देवहो, दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य कसे व्हावयाचें ? ३५७ त्यजन्ति दारान्पुत्रांश्च मनुष्याः परिपूजिताः ।। १२/९११५३ मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाहि त्याग करण्यास तयार होतात.
३५८ त्यजेत्कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् || ५|३७|१७
[ प्रसंग पडल्यास ] कुलाच्या रक्षणाकरितां कुलांतील एका मनुष्याचा त्याग करावा. - सबंध ग्रामाकरितां एका कुळाची पर्वा करूं नये. देशाकरितां एका गांवावरहि उदक सोडावें. आणि आत्मकल्याणाकरितां सर्व पृथ्वीचाहि त्याग करावा.
For Private And Personal Use Only