Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३४७ तपसा प्राप्यते स्वर्गस्तपसा प्राप्यते यशः ।
आयुः प्रकर्षों भोगाश्च लभ्यन्ते तपसा विभो ॥१३॥५७/८ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात,) तपानें स्वर्ग मिळतो, तपाने यश प्राप्त होते. आयुष्य, वैभव आणि सर्वप्रकारच्या उपभोग्य वस्तु तपानें प्राप्त होतात. ३४८ तपसा लभ्यते सर्वम् ॥१२॥१५३४
तपाने सर्व काही प्राप्त करून घेता येते. ३४९ तपसा विन्दते महत् ।।३।३१३१४८
तपाच्या योगाने मनुष्य महत्पदाला पोचतो. ३५० तपः स्वधर्मवर्तित्वम् ।। ३।३१३१८८
ता म्हणजे स्वधर्माप्रमाणे वागणे. ३५१ तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भ
गौर्वोढारं धावितारं तुरङ्गी । शूद्रा दासं पशुपालं च वैश्या
वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥ ११।२६।५ ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्याने [ जन्माला येऊन ] तप करावे म्हणून, गाईने ओझी वाहणारा, घोडीने धावणारा, शूद्रस्त्रीने दास्यकर्म करणारा, वैश्य स्त्रीने गुरे राखणारा आणि क्षत्रिय राजकन्येनें युद्धांत मरून जाणारा, गर्भ धारण केलेला असतो. ३५२ तरसा ये न शक्यन्ते शस्त्रैः सुनिशितैरपि ।
साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभिः।।१२।१३९।३९ जबरदस्तीने अथवा तीक्ष्ण शस्त्रांच्या योगानेंहि ज्यांना दाबांत ठेवितां येत नाही ते सुद्धा, हत्ती हत्तिणींना वश होतात त्याप्रमाणे, सामोपचाराने वश करितां येतात.
For Private And Personal Use Only