Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३२७ चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः ॥ ६।२८।१३
[ भगवान् श्रीकृष्ण म्हणतात ] गुण आणि कर्म यांच्या अनुरोधाने चातुर्वर्ण्य मीच उत्पन्न केले. ३२८ चारैः पश्यन्ति राजानः ॥ ५॥३४॥३४
राजे लोक हेरांच्या द्वारे पहात असतात. ३२९ चिरं ह्यपि जडः शूरः पण्डितं पर्युपास्य ह । ___ न स धर्मान्विजानाति दर्वी सूपरसानिव ॥ १०५।३
जो बुद्धीचा जड तो धिमेपणाने फार दिवस जरी एकाद्या पंडिताजवळ राहिला तरी. पक्वान्नांतीळ पळीला पक्वान्नाची गोडी जशी कळत नाही, तसा त्याला धर्मतत्त्वांच बोध म्हणून होत नाही ! ३३० चिरकारी हि मेधावी नापराध्यति कर्मसु ॥ १२।२६६।३
विचारपूर्वक फार वेळानें काम करणारा बुद्धिमान् मनुष्य कामांत चुकत नाही. . ३३१ जरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव ।
बलिनां दुर्बलानां च इस्वानां महतामपि ॥ १२।२८।१४ सबळ दुर्बळ, लहान थोर, सर्व प्राण्यांना जरा व मरण ही लांडग्यांप्रमाणे खाऊन टाकितात. ३३२ जरा रूपं हरति हि धैर्यमाशा
मृत्युः प्राणान्धर्मचर्याममूया । क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा
हियं कामः सर्वमेवाभिमानः ॥ ५॥३५/५० वार्धक्य रूपाचा नाश करतें; आशा धैर्याचा, मृत्यु प्राणांचा, मत्सर धर्माचरणाचा, क्रोध लक्ष्मीचा, दुर्जनसेवा शीलाचा, विषयेच्छा विनयाचा, आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो.
For Private And Personal Use Only