Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१ मिळत.
३१३ गुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।
अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ ५।३५/७१ सुष्टांचा शास्ता गुरु, आणि दुष्टांना शासन करणारा राजा होय. परंतु चोरून पापें करणाऱ्यांना शिक्षा करणारा विवस्वानाचा पुत्र यम हाच होय. ३१४ गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये ।
यतो भूयास्ततो राजन्कुरुष्व धर्मनिश्वयम् ॥ ३॥१३१।१३ ( ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिविराजाला म्हणतो. ) हे राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता, याचा निर्णय करितांना तारतम्य पाहून त्यांतल्या त्यांत जो अधिक श्रेयस्कर दिसेल तोच धर्म, असें निश्चित समज. ३१५ गुरुशुश्रूषया ज्ञानं शान्ति योगेन विन्दति ॥ ५॥३६॥५२
गुरुशुश्रूषेनें ज्ञान आणि योगाने शांति मिळते. ३१६ गुरूणामवमानो हि वध इत्यभिधीयते ॥ ८७०।५१
गुरुजनांचा अपमान करणे म्हणजे त्यांचा वधच करणे होय ! ३१७ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।
उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥१११४०५४ गर्वाने फुगून गेलेला, कार्य कोणतें अकार्य कोणते हे न जाणणारा, व दुर्मार्गाने चालणारा गुरु जरी असला तरी त्याला शिक्षा करणे न्याय्य आहे. ३१८ गृध्रदृष्टिबकालीनः श्वचेष्टः सिंहविक्रमः ।
अनुद्विग्नः काकशङ्की भुजङ्गचरितं चरेत् ॥१२॥१४०।६२ [ कार्यसाधु पुरुषाने ] गिधाडासारखी दूरदृष्टि ठेवावी, बगळ्याप्रमाणे निश्चल रहावें, कुत्र्यासारखें सावध असावे, सिंहासारखा पराक्रम गाजवावा. निर्भय राहून कावळ्याप्रमाणे साशंक असावें, व सर्पासारखें नागमोडी वर्तन ठेवावें. ३१९ गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते ॥ १२॥२३४१६ गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्याचा मल आधार आ
For Private And Personal Use Only