Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२९१ क्षत्रियस्य मलं भैक्ष्यं ब्राह्मणस्याव्रतं मलम् । ८१४५।२३
भिक्षा मागणे हे क्षत्रियाला लांछन आहे, व्रतादिकांचा त्याग करणे हे ब्राह्मणाल लांछन आहे. २९२ क्षत्रियस्य महाराज जये वृत्तिः समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववृत्तौ का परीक्षणा ॥ २।५५/७ युद्धांत जय मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे; मग त्यांत धर्म असो किंवा अधर्म असो. स्वतःच्या व्यवसायाची चिकित्सा करून काय फायदा ? २९३ क्षत्रियस्य विशेषेण हृदयं वज्रसंनिभम् ॥ १२।२२।९
क्षत्रियाचे अंतःकरण विशेषेकरून वज्रासारखें कठीण असले पाहिजे. २९४ क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिबर्हणात् ॥४२११४३
सदोदित शत्रूचे पारिपत्य करणे याशिवाय क्षत्रियाचा दुसरा धर्म नाही. २९५ क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्याद्धन्येत वा पुनः॥७१९७१३८
एकतर मारावें, नाही तर मरून जावें हाच क्षत्रियाचा धर्म. २९६ क्षत्रियस्यातिहत्तस्य ब्राह्मणेषु विशेषतः ।
ब्रह्मैव संनियन्तु स्यात्क्षत्रं हि ब्रह्मसंभवम् ॥१२।७८।२१ क्षत्रिय जर आपला धर्म सोडून विशेषतः ब्राह्मणांवर अत्याचार करूं लागेल, तर ब्राह्मणच त्याचे नियमन करील. कारण, क्षत्रिय हा ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला आहे. २९७ क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणानां क्षमा बलम्॥१।१७५/२९
क्षत्रियांचे बळ पराक्रम. ब्राह्मणांचे बळ क्षमाशीलता. २९८ क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥ १२॥५६।३९ राजा सदैव अपराध सहन करूं लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा त्याची अवज्ञा करूं लागतात. ( इतकेच नव्हे तर) हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणाऱ्या महाताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करूं लागतात.
For Private And Personal Use Only