Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२८४ को हि नाम पुमाँल्लोके मर्षयिष्यति सत्त्ववान् ।
सपत्नानृध्यतो दृष्टा हीनमात्मानमेव च ।। २।४७१३२ आपल्या वैयांचा उत्कर्ष होत आहे, आणि आपण मात्र हीनस्थितीत आहों, असें पाहून खरोखर कोणता बाणेदार पुरुष ते सहन करील ? २८५ कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥६।३३।३१
(श्रीकृष्ण म्हणतात.) अर्जुना, माझा (भगवंताचा ) भक्त कधींहि नाश पावत नाहीं हे तूं पक्कं समज. २८६ ऋव्यादा अपि राजेन्द्र कृतघ्नं नोपभुञ्जते ॥१२।१७२।२४
हिंस्र पशुपक्षीसुद्धां कृतघ्नाला भक्षण करीत नाहीत. २८७ क्लीबा हि वचनोत्तराः ॥ ५।१६२।४४
नामर्द लोक नुसते बोलण्यांत शूर असतात. २८८ क्लेशान्मुमुक्षुः परजात्स वै पुरुष उच्यते ॥ २।४९।१३
शत्रूकडून होणारी पीडा दूर करण्यास झटतो त्यालाच पुरुष म्हणावें. २८९ क्षताद्भीतं विजानीयादुत्तमं मित्रलक्षणम् ।
- ये तस्य क्षतमिच्छन्ति ते तस्य रिपवः स्मृताः॥१२।८०१९ . [राजावर ] येणाऱ्या संकटाची भीति वाटणे हे (राजाच्या) उत्तम मित्राचे लक्षण होय आणि जे त्याचा नाश इच्छितात ते त्या राजाचे शत्रुच होत. २९० क्षत्रधर्म विदित्वाहं यदि ब्राह्मण्यमाश्रितः ।
प्रकुर्या सुमहत्कर्म न मे तत्साधुसंमतम् ॥१०।३।२२ . [ अश्वत्थामा कृपाचार्यास म्हणतो. ] क्षत्रिय धर्म एकदा पत्करल्यावर जर मी ब्राह्मणधर्माला अनुसरून शमदमादिक मोठमोठी साधनें करीत बसेन, तर ते माझें करणें सज्जनांना पसंत पडणार नाही. ( 'विदित्वा' म्हणजे जाणून असा नेहमींचा अर्थ असतां या ठिकाणी ' पत्करल्यावर ' असा अर्थ प्रसंगानें व लक्षणेने घेतला आहे.)..
For Private And Personal Use Only