Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
२७२ कुर्यात्तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम् । अन्धःस्यादन्धवेलायां बाधिर्यमपि संश्रयेत्।। १२।१४०।२७
[ राजानें प्रसंगविशेषीं ] तृणाचें देखील धनुष्य करावें, हरिणाप्रमाणे सावधपणानें झोंप घ्यावी, अंध होण्याचा प्रसंग आल्यास अंधाप्रमाणें वागावें, व [ बधिर होण्याचा प्रसंग आल्यास ] बहिरेपणाचाहि आश्रय करावा.
४५
२७३ कुलानि समुपेताति गोभिः पुरुषतोऽर्थतः ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्तः || ५ | ३६।२८ गोधन, कर्तबगार पुरुष आणि द्रव्य यांच्या योगानें कुलांना मोठेपणा प्राप्त होत असतो. पण तीं आचार भ्रष्ट असली तर त्यांची गणना चांगल्या कुळांत होत नाहीं. २७४ कुलीनस्य च या निन्दा वधो वाऽमित्रकर्शन ।
महागुणो वधो राजन्न तु निन्दा कुजीविका ||५/७३।२४
( श्रीकृष्ण म्हणतात. ) हे शत्रुनाशका धर्मराजा, कुलीन पुरुषाची निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला असतां त्याचा वध होणें फार बरें; जीवितच दुःखदायक करून टाकणारी निंदा बरी नव्हे.
२७५ कृतज्ञेन सदा भाव्यं मित्रकामेन चैव ह ।। १२।१७३।२२ मनुष्यानें सदैव कृतज्ञ असावें, व मित्र जोडण्याविषयीं इच्छा बाळगावी. २७६ कृतं ममाप्रियं तेन येनायं निहतो मृधे ।
इति वाचा वदन्हन्तून् पूजयेत रहोगतः || १२ | १०२।३७
' संग्रामांत ज्याने या योद्ध्याचा वध केला असेल त्यानें माझें अप्रिय केलें ' असे उद्गार तोंडाने काढावे, आणि अंतस्थ रीतीने त्या शत्रूला ठार मारणाऱ्यांचा गौरव करावा.
२७७ कृतवैरे न विश्वासः कार्यस्त्विह सुहृद्यपि ।
छन्नं संतिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु || १२ | १३९/४४ वैर करणारा मनुष्य जरी मूळचा मित्र असला तरी त्याजवर विश्वास ठेवू नये.. कारण, लाकडांत दडून राहिलेल्या अमीप्रमाणें वैर गुप्तपणे वसत असतें.
For Private And Personal Use Only