Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहामारतसुभाषितानि
२५७ काले मृदुर्यो भवति काले भवति दारुणः ।
प्रसाधयति कृत्यानि शत्रु चाप्यधितिष्ठति॥१२॥१४०६७ योग्य वेळी जो सौम्य होतो व योग्यवेळी भयंकर होतो त्याची सर्व कार्य सिद्धीस जातात आणि तोच शत्रूला आपल्या ताब्यात ठेवितो. २५८ काले हि समनुप्राप्ते त्यक्तव्यमपि जीवनम् ॥ ५।९०७७.
तसाच प्रसंग पडला असतां जीविताचासुद्धा त्याग केला पाहिजे. २५९ कालोन परिहार्यश्च न चास्यास्ति व्यतिक्रमः॥१२॥२२७।९७
काळाला चुकवितां येणे शक्य नाही. तसेंच त्याचा प्रतिकारहि करितां यावयाचा नाही. २६० कालोपहतचित्ता हि सर्वे मुह्यन्ति भारत ॥ ९॥६३।४७
खरोखर काळाने बुद्धि ग्रासून टाकली असता सर्वांना मोह पडत असतो. २६१ कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् । . इति ते संशयो माभूद्राजा कालस्य कारणम् ॥ १२॥६९/७९
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात.) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयीं तूं संशयांत पडूं नको. कांकी, राजा हाच काळाला कारण आहे. २६२ कालो हि परमेश्वरः ॥ १३॥१४८।३९
काळ हा खरोखर परमेश्वरच आहे ! २६३ किंचिदेव ममत्वेन यदा भवति कल्पितम् ।
तदेव परितापार्थं नाशे संपद्यते पुनः ।। १२।२७६।८ एकाद्या वस्तूविषयी ही माझी' अशी भावना धरिली, म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला असतां तीच दुःखाला कारण होते. २६४ किं तस्य तपसा राज्ञः किंच तस्याध्वरैरपि ।
सुपालितप्रजो यः स्यात् सर्वधर्मविदेव सः॥१२।६९/७३ जो राजा प्रजेचें उत्तम प्रकारे पालन करितो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तप काय करावयाचें ? यज्ञांची तरी त्याला काय गरज ? २६५ किं तु रोषान्वितो जन्तुहेन्यादात्मानमप्युत ॥ ७१५६।९५
खरोखर क्रोधाविष्ट झालेला मनुष्य स्वतःचा देखील घात करील.
For Private And Personal Use Only