Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४१
२४५ काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं माहुस्त्यागं विचक्षणाः ॥ ६४२।२ [भगवान् श्रीकृष्ण सांगतात ] सकाम कर्माचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष संन्यास असे म्हणतात. आणि सर्व कर्माच्या फलाचा म्हणजे फलाशेचा त्याग करणे यालाच शहाणे लोक त्याग म्हणतात. २४६ कारणात्मियतामेति
द्वेष्यो भवति कारणात् । अर्थार्थी जीवलोकोऽयं
न कश्चित्कस्यचित्मियः ॥ १२।१३८।१५२ कोणी झाला तरी काहीतरी कारणानेच प्रिय वाटतो, व कारणानेंच द्वेष्य वाटतो. हे जग सगळे स्वार्थी आहे. [ खरोखर निष्कारण ] कोणी कोणाला प्रिय नसतो. २४७ कारणाद्धर्ममन्विच्छन्न लोकचरितं चरेत् ॥१२।२६२।५३
हेतूकडे लक्ष्य देऊन धर्माचरण करावें, केवळ लोकांनी केले म्हणून आपणहि तसें करूं नये. २४८ कार्यापेक्षा हि वर्तन्ते
भावस्निग्धाः सुदुलेभाः ॥ १२॥११११८६ कार्याच्या अपेक्षेनेंच लोक प्रेमाने वागतात. खरोखर स्वभावतःच प्रेमळ असे लोक अत्यंत दुर्लभ. २४९ कालः कर्षति भूतानि सर्वाणि विविधान्युत ।
न कालस्य प्रियः कश्चिन्न द्वेष्यः कुरुसत्तम ॥ ११।२।८ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो. ] हे कुस्श्रेष्ठा, निरनिराळ्या प्रकारच्या सर्व प्राण्यांना काळ ओढून नेतो. काळाला कोणी प्रिय नाही, कोणी द्वेष्य नाही. २५० कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः।
कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥११।२।२४ काळ प्राण्यांना शिजवून काढतो; काळ प्रजेचा संहार करतो, सर्व प्राणी झोपीं गेले असतां काळ जागा राहतो. खरोखर काळाचे अतिक्रमण करणे अशक्य आहे !
For Private And Personal Use Only