Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
~
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २३९ कल्योत्थानरतिनित्यं गृहशुश्रूषणे रता । . सुसंमृष्टक्षया चैव गोशकृत्कृतलेपना ॥ १३१४६१४८ · [स्त्रीनें ] सकाळी लवकर उठून दक्षतेने घरकाम करावे. सर्व घर उत्तमप्रकारें झाडून स्वच्छ करावे. आणि गाईच्या शेणाने सारवून काढावे. २४० कश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम् ।
स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते॥१२॥१३८१६२ एकादा प्राणी लाकडाच्या ओंड्याचा आश्रय करून अतिखोल व विस्तीर्ण नदी तरून जातो. [ त्यासमयीं ] तो त्या लाकडाला नदीपार करतो, व लाकूडहि त्याला तारून नेते. २४१ कामक्रोधग्राहवती पञ्चेन्द्रियजला नदीम् ।
नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुगाणि संतर ॥५४०२२ काम व क्रोध ह्या जिच्यांतील सुसरी आहेत, आणि चक्षुरादि पांच इंद्रिये हे जिच्यांतील उदक आहे, अशी ही संसाररूप नदी ज्ञानरूप नौकेचे अवलंबन करून जन्ममरणपरंपरारूप धोक्याची स्थळे चुकवून तरून जा. २४२ कामचारी तु कामेन य इन्द्रियसुखे रतः।
ब्रह्मचारी सदैवैष य इन्द्रियजये रतः ॥ १४॥२६।१५ विषयलालसेनें जो इंद्रियसुखांत गढून जातो तो कामचारी होय. जो सदैव इंद्रियांचे दमन करण्यांत आनंद मानतो तो ब्रह्मचारी होय. २४३ कामं नैतत्पशंसन्ति सन्तः स्वबलसंस्तवम् ।
गुणसंकीर्तनं चापि स्वयमेव शतक्रतो ॥ ॥३४२ (गरूड म्हणतो ) हे इंद्रा, स्वतःच्या बळाची स्तुति करणे आणि आपणच आपलें गुणवर्णन करणे हे सज्जनांना मुळींच प्रशस्त वाटत नाही. २४४ कामे प्रसक्तः पुरुषः किमकार्य विवर्जयेत् ॥१२।८८२१ कामासक्त पुरुष कोणतें अकार्य वर्ण्य करील ?
For Private And Personal Use Only