Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२१९ एतत्पृथिव्याममृतमेतच्चक्षुरनुत्तमम् ।
यद्ब्राह्मणमुखाच्छास्त्रमिह श्रुत्वा प्रवर्तते ॥१३॥३६।१० ब्राह्मणाच्या तोंडून शास्त्रार्थ ऐकून त्याप्रमाणे वर्तन करणे हे पृथ्वीवरील अमृत होय, हेच सर्वोत्कृष्ट दिव्य ज्ञान होय. “२२० एतावानेव पुरुषः कृतं यस्मिन्न नश्यात ॥११५७।१४
ज्याच्या टिकाणी केलेला उपकार व्यर्थ जात नाही तोच मनुष्य म्हणावयाचा. २२१ एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी ॥ ५।१३३३३३
जो अपमान व अपकार सहन करीत नाही, तोच पुरुष. २२२ ऐकगुण्यमनीहायामभावः कर्मणां फलम् । ___अथ द्वैगुण्यमीहायां फलं भवति वा न वा ॥५/१३५।२८
उद्योगरहित राहिले असतां उद्योगाने प्राप्त होणारें में फल त्याचा अभाव हा एकच प्रकार संभवतो. परंतु उद्योग करीत राहिले असतां, फल प्राप्त होणे व न होणे असे दोन प्रकार संभवतात. २२३ ऐश्वर्यमदमत्तो हि नापतित्वा विबुध्यते ॥ ५॥३४॥५३ __ ऐश्वर्यमदानें धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाही. २२४ कः कस्य चोपकुरुते कश्च कस्मै प्रयच्छति ।
प्राणी करोत्ययं कर्म सर्वमात्मार्थमात्मना ॥ १२।२९२।१ कोण कोणावर उपकार करणार ? आणि कोण कोणाला देणार ? जो तो प्राणी सर्व कांही स्वतःकरितां करीत असतो. २२५ कच्चिच्छारीरमाबाधमौषधैर्नियमेन वा।
मानसं वृद्धसेवाभिः सदा पार्थापकर्षास ॥२।५।८९* [ नारदमुनि विचारतात ] बा युधिष्ठिरा, शारीरिक पीडा औषधाने व नियमित आचरणाने आणि मानसिक पीडा वृद्ध जनांची सेवा करून तूं नेहमी दूर करतोस ना ?
__* श्लोक २२५ ते २३१ नारदमुनींनी युधिष्ठिराला विचारलेल्या ' कच्चितप्रश्नांतील' आहेत.
For Private And Personal Use Only